पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"

इमेज
        सध्या महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला उधाण आलेल पाहिला मिळत आहे.आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शो ला विरोध काहींचा असा समज आहे की नृत्यांगना गौतमी पाटील हिने लावणीचा या लोककलेचा अवमान करीत आहे व नृत्य करताना अश्लील कृत्य करीत आहे त्यासाठी गौतमी पाटीलला विरोध होत आहे.         अवघ्या तरुणाईला आपल्या नृत्याने वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिने आज मात्र टीकाकार यांच्या विरोधाला पूर्णविराम लावले आहे.साम TV ने घेतलेल्या मुलखातीत तिने स्पष्ट आणि बिनदास्त मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत तिने पूर्णपणे स्पष्ट केले आहे की मी कुठे चुकत नाही आणि मी घाबरू कशाला कोणाला मी नृत्य करते ते वेस्टर्न नृत्य आहे.फक्त ज्यांनी टीका केली त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला आहे हा त्यांचा दृष्टिकोन आहे मी त्याला काही करू शकत नाही असे यावेळी मुलाखतीत म्हटले आहे.         मी जे नृत्य करत आहे ते वेस्टर्न नृत्य आहे लावणीचा आणि माझा काहीही संबंध नाही असे यावेळी निर्भीडपणे आपली मते व्यक्ती केली.लावणीचा कार्यक्रम हा पूर्णपणे लावणी केला जातो मात्र मी जे नृत्य करते ते DJ वर करते

"रंगात गुरफटलो आम्ही"

इमेज
        आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलोय आजचा ब्लॉग म्हणजे एका विषयाकडे हात घालणारा ब्लॉग आहे पण या ब्लॉगने काहींना मिर्ची लागणार तर काहींना हा ब्लॉग आवडणार पण मित्रांनो आवडो किंवा न आवडो दोन्ही विचार सरणीच्या लोकांनी या ब्लॉगचा अर्थ नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.आपण आजचा ब्लॉग हा देशात कोण्ही कोणता रंग वापरायचा यावर होत असलेल्या राजकारणावर आहे.        आज देशात काही संकोचीत बुद्धीच्या लोकांची संख्या जास्तच वाढत असताना आपल्याला मिळत आहे.आणि त्या संकोचीत बुद्धीच्या लोकांनी देशात जाती धर्मावरून राजकारण सुरू केले आहे आणि ते म्हणजे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी (whatsapp university)  मधून शिक्षण घेऊन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे.अर्थात फॉरवर्ड (Forward) मेसेज पसरवून हुशारी दाखवण्याचे काम सध्या होताना दिसत आहे.         देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना लोकशाही प्रधान मानणाऱ्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत तर नाहीना असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे देखील आजच्या परिस्थितीतुन दिसून येत आहे.