"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.

         मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.
         सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .
        
तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज कोणाचे जीवन उडवस्त नाही ना करत याचे भान प्रत्येक सुजाण नागरिकांनी राखावे . सरकारने सर्वप्रथम नायलॉन मांजा तयार करण्यावरच बंदी घातली पाहिजे असे माझे ठाम मत आहे. आपली,आपल्या कुटुंबाची ,आपल्या समाजाची , आपल्या राष्ट्राची काळजी घेणे त्यांचे हित जोपासणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

        कित्येक प्राण्यांना मांजाने आपला जीव गमवावा लागला असल्याने यावर मात्र अजून तरी निर्बंध घातला नसल्याने चिंतेची बाब आहे.दौंडमध्ये मनमाड सांगली महामार्गावर पन्नालाल जयगोविंद यादव वय वर्ष 38 या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता तरीही देखील अजून कोणतीही कडक निर्बंध पहायला मिळत नाही.

        पंतग उडवण्याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे मात्र चायनीज मांजाचा वापर करून काचा वापरून तयार केलेला मांजा वापरणे टाळले पाहिजे.पंतग उडवण्याच्या स्पर्धेत चायनीज मांजा व घरगुती काचाने बनवलेला मांजा वापरला जातोय यावर नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती देखील केली पाहिजे यासाठी सर्वांना पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-मा.नगरसेविका.सौ.प्रनोती मंगेश चलवादी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"