"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"

        सध्या महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला उधाण आलेल पाहिला मिळत आहे.आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शो ला विरोध काहींचा असा समज आहे की नृत्यांगना गौतमी पाटील हिने लावणीचा या लोककलेचा अवमान करीत आहे व नृत्य करताना अश्लील कृत्य करीत आहे त्यासाठी गौतमी पाटीलला विरोध होत आहे.

        अवघ्या तरुणाईला आपल्या नृत्याने वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिने आज मात्र टीकाकार यांच्या विरोधाला पूर्णविराम लावले आहे.साम TV ने घेतलेल्या मुलखातीत तिने स्पष्ट आणि बिनदास्त मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत तिने पूर्णपणे स्पष्ट केले आहे की मी कुठे चुकत नाही आणि मी घाबरू कशाला कोणाला मी नृत्य करते ते वेस्टर्न नृत्य आहे.फक्त ज्यांनी टीका केली त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला आहे हा त्यांचा दृष्टिकोन आहे मी त्याला काही करू शकत नाही असे यावेळी मुलाखतीत म्हटले आहे.
        मी जे नृत्य करत आहे ते वेस्टर्न नृत्य आहे लावणीचा आणि माझा काहीही संबंध नाही असे यावेळी निर्भीडपणे आपली मते व्यक्ती केली.लावणीचा कार्यक्रम हा पूर्णपणे लावणी केला जातो मात्र मी जे नृत्य करते ते DJ वर करते याच्यात आणि त्याच्यात मोठा फरक आहे असे देखील गौतमी पाटील म्हणाली.दहीहंडी या कार्यक्रमात जे आयोजक साउंड सिस्टीमचे आयोजन करत असतात त्यात DJ लावणाऱ्याने वेस्टर्नच गाणं लावल आणि मी लावणीच्या Costume वर असेल तर मी त्याला काय करणार मला त्यावर डान्स करावा लागेलचना त्या मूव्हमेंट मध्ये चेंज करू शकत नाही कपड्यावरुन कोण कुठे काय बोलेल काय सांगता येत नाही अर्थ काढणार्यांनी अर्थ वेगळा काढला.

         ज्या लोकांना माझा कार्यक्रम अश्लील वाटत असेल तर त्यांनी माझा कार्यक्रम पाहू नये असे देखील निर्भीडपणे मत मांडले टीका करणाऱ्यांवर मैत्रीपूर्ण हावभाव घेऊन म्हणाली की मी कुठे चुकत असेल तर मला सांग आणि माझा कार्यक्रम पाहण्यासाठी मी माझ्या सोबत गाडीत बसवून घेऊन जाईल आणि कार्यक्रम संपला की मी कुठे चुकले ते त्याने सांगावे असे स्मितहास्य करीत उत्तर दिले.

        सोशल जे app आहेत तिथे मला जास्त प्रमाणात काही लोक ट्रोल करतायेत तर काही लोक माझ्या बाजूने आहे तर मला आनंद आहे माझ्या बाजूने जे आहेत ते लोक नक्कीच माझ्याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.लावणी वरून तिला ट्रोल केले जात होते त्यावर आज टीकाकार चक्रावले असतील मुलखतीत गौतमी पाटील ने स्पष्ट केले की मी लावणी शिकले आणि मला येत नाही मी आता शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?