नमस्कार मित्रांनो आपण आज पुन्हा एका नवीन विषयाकडे वळणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला माझा नवीन ब्लॉग आवडेल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या ब्लॉगला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.
मी आहे पवन साळवे आणि आपल्यासाठी जीवनात होणाऱ्या नवनवीन विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही देखील चांगले प्रेम देत आहात.हा चला तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू पोटासाठी वणवण हा आपला विषय आहे.जीवनात जीवन जगत असता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काहींना काही तरी काम तर करावेच लागतात पण माझ्या नजरेत एक दृश्य आहे ते मी आपल्या समोर मांडणार आहे.
फोटोमध्ये तुम्ही पहा एक पोतराज आहे आणि त्याची बायको आणि मूल हे आपला उदरनिर्वाह चालवत आहे दक्षिणा मागत आहेत तर खाण्याची वस्तू आपल्या मुलाबाळांच्या पोटासाठी एक वेळेची भाकर तर देणे त्यांचे आद्यकर्तव्य आहेच मात्र कित्येक वर्षे हे अस चालत येत आहे यांच्यात परिवर्तन म्हणजे काय हे अजून देखील समजले नसल्याने ही परिस्थिती वर्षानुवर्षे चालूच राहिली आहे.मी देखील लहानपणापासून तेच दृश्य पाहत आलोय ते म्हणजे पोतराज आहे दक्षिणा मागत आहे अंगावर चाबूक मारत आहे.
वडील अंगावर चाबूक मारत आहे आणि बायको आणि मूल हात पुढे करून खाण्याची वस्तू आणि दक्षिणा गोळा करीत आहे अंधश्रद्धाच्या नावावर हे दाम्पत्य आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जागृत का राहत नाहीये हीच मोठी शोकांतिका आहे.आई वडील दक्षिणा मागत आहेतच मात्र मुलांना देखील त्याच पद्धतीने मागत मोठे झाले की ते देखील त्याच पद्धतीने दक्षिणा मागणार यात परिवर्तन कुठे आहे यात तर अंधश्रद्धेचे समर्थन दिसत आहे आणि त्याची व्याप्ती.
त्या लहान मुलाला त्याच्या पुढील आयुष्यात काय होणार हे माहिती नाहीये पण माझी आणि वडील हे अंगावर चाबूक मारत आहेत आणि आपल्याला त्यांच्यासोबत जायचे आहे आणि पैसे गोळा करायचे आहे पण पुढील भविष्याचे काय यावर कोणीच प्रकाश टाकला नाही कारण त्याच्या आई वडिलांनी कधी त्यावर विचारच केला नाही फक्त चाबूक मारणे आणि पैसा गोळा करून मुलांचे पोट भरणे देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे मंग अश्या रूढी परंपरेत का अडकलेत? मार्गदर्शन कमी पडत तर नाहीना.त्या छोट्या चिमुकल्या बालकांना आपले भविष्य माहिती नाही आई वडील जे करतात तेच आपण करायचे आहे हेच त्यांच्या डोक्यात सेट झाले आहे.
त्यांच्या मनावर शिक्षणाचे बीज पेरणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या बिजातून ज्ञानाचा सागर बाहेर निघणार तोच पुढील पिढीचे आयुष्य बदलणार त्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणणे काळाची गरज आहे.पिढ्यान्पिढ्या अंगावर चाबूक मारून अंगाची लाही लाही होते आणि त्याच खाईत पुन्हा आपल्या पुढील पिढीला देखील ढकलले जात आहे हे कुठे तरी थांबणे महत्वाचे आहे.त्यासाठी त्यांना अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोणत्याच प्रकारची मार्गदर्शन मिळाले नसल्याने अजून अंगावर चाबकाचे पट्टे दिसत आहे.अंधश्रद्धेच्या अंधारात वर्षानुवर्षे राहून देखील काही साध्य झाले मंग अजून कित्येक दिवस पोटासाठी अंगावर चाबकाचे फटके खायचे मुलाचे भविष्य नाहीना प्रगती नाही मंग किती दिवस? अंधारातून प्रकाशाकडे देश जात असताना काही ठराविक लोक अंधारात का?प्रगती ही शिक्षणाने होणार आहे हे तेवढेच सत्य आहे आणि अंधारातून प्रकाशात शिक्षणच अनु शकते त्यासाठी शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे.
श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धा नसावी हे देखील महत्वाचे आहे.त्यासाठी पोटासाठी वणवण अश्या पद्धतीने करत असाल तर यामध्ये परिवर्तन होणार नाही हे मात्र खरय.छोट्या त्या बालकाला आपले पुढील भविष्य माहिती नाही आई वडील जे करत आहेत त्यांचेच ते अनुकरण करत आहेत.तातपर्य एवढेच आहे मुलांना शिक्षण द्या त्यांच्याकडून अश्या प्रकारे कामे करवून घेऊ का आणि त्यांच्या जीवनाचा शिल्पकार होण्यास मदत करा देशाचे भविष्य हेच ते चिमूकले आहेत त्यांच्या मनावर जसा प्रभाव तसेच ते तरुणपणात घडतात त्यासाठी लहानपणी त्यांच्यावर शिक्षणाचा पगडा टाका भविष्यात तेच आपले जीवन बदलू शकतात अर्थात जे पेराल तेच उगेलं.
मित्रांनो माझ्या या विषयाने काहींचे मने दुखतील तर काही कौतुक देखील करतील माझ्या मते मला सत्य परिस्थिती मांडायची आहे आणि ती मांडली कारण माझा ब्लॉग हा सत्यता पडताळूनच सत्य मांडत आहे.आणि हा माझा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि पुढे कोणत्या प्रकारचा ब्लॉग असावा हे देखील कळवा धन्यवाद.
बरोबर आहे शिक्षणासिवाय परिवर्तन होणार नाही.
उत्तर द्याहटवाCHANGLYA VISHYAVAR PRAKASH TAKLA
उत्तर द्याहटवा