"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

        नमस्कार मित्रांनो Blog मराठीत कमी हिंदी आणि अन्य भाषेत खूप पहायला आणि ऐकायला मिळत आहे आता मी तुमच्यासाठी मराठीत देण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि तुम्हाला एक विनंती देखील आहे की हा व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या.
        आज मी तुमच्यासाठी नवीनच विषय घेऊन आलोय तो म्हणजे २५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा मित्रांनो आज मितीला मुलीचे वय १८ च्या पुढे गेले की तिच्या लग्नाची तयारी सुरू होते आणि मुलीच्या आईच्या अपेक्षा देखील खूपच असतेच सहाजिकच असणारच कारण आपल्या मुलीचा जोडीदार हा चांगल्या हुद्यावर असावा,स्वतःचे घर असावे,आणि निर्व्यसनी असावा अश्या अनेक अपेक्षा मुलांकडून पहिल्या जातात.आपल्या मुलीचे भविष्य चांगले असावे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि ती असायलाच पाहिजे.

        पण २५ वर्षाच्या मुलांकडून एवढ्या अपेक्षा करणे कितपत योग्य आहे हे देखील तपासूनच पाहिले पाहिजे.मित्रांनो मुलाच्या आई वडिलांची प्रॉपर्टी आणि मुलाची स्वतःची वयक्तिक प्रॉपर्टी यात जमीन असमानचा फरक तर आहेच.काही लोक आई वडिलांची प्रॉपर्टी पाहून मुलगी देतात तर काही त्याची वयक्तिक प्रॉपर्टी पाहून.माझ्या मते 25 वय झाल्यानंतर जगाची रीत समजायला लागते तेव्हाच तर अश्या प्रकारची अट ठेऊन मुलगा पाहण्याची ओढ सुरू होते.

        आणि कामाच्या शोधात २५  वयानंतर त्याचे ३० होते नंतर म्हटले जाते त्याचे वय खूप झाले आता मुलगी कशी देऊ.अगोदर अपेक्षा पैसा,जमीन,नौकरी याची असते वय झाले की अडचण येते ती म्हणजे वयाची माणसांच्या विचारसरणी मध्ये केव्हा आणि कधी कसा बदल होईल त्याचा नेम नसतो.सांगायचा मुद्दा एवढा आहे.ज्या आईवडील आपल्या मुलीसाठी मुलगा शोधत असतात ते अजून देखील घराचे हप्ते भरत आहेत मंग २५ वर्षाच्या मुलांकडून एवढ्या मोठ्या अपेक्षा का?

        फक्त graduation होईपर्यंत २१ वर्ष जातात
जॉब शोधण्यात २-३ वर्ष आणि जॉब लागल्यावर आईवडीलाची अपेक्षा असते मुलाला येवढे शिकवले आता घरासाठी काही तरी हातभार लावला पाहिजे मग एवढ्या सगल्या अपेक्षा कश्या पूर्ण करणार? मुद्दा देखील विचारकरण्यासारखा आहे.तातपर्य एवढेच स्वतः मुलाने हिमतीवर उद्योग व्यवसाय,पैसा कमावतो तोच तर आयुष्यभर आपल्या मुलीला सुखी ठेऊ शकतो मुलाच्या आईवडिलांची जमीन पैसा पाहून मुलगी देणे म्हणजे मूर्खपणा म्हणावा लागेल.

        आपले ५०,६० वय झाले तरी स्वतःचे घर घेऊ शकले नाही त्यांनी २५ वर्षाच्या एवढ्या अपेक्षा नाहीच केल्या पाहिजे.मुलीचा जोडीदार हा कामाला असणारा असावा यात काही शंका नाही मात्र एवढ्या कमी वयात एवढ्या अपेक्षा करणे योग्य नाही.जोडीदार मुलीसाठी पहावा तो त्याचा स्वभाव, निर्व्यसनी,शिक्षित,कमी वयात एवढ्या मोठ्या अपेक्षा नाही केल्या पाहिजे कारण आपण ५०,६० जे करू शकलो नाही ते २५ वयाच्या मुलाकडून का कराव्यात हाच तर मुद्दा आहे.

        अपेक्षा पाहण्याच्या नादात मुलीचे वय देखील आणि मुलांचे वय देखील आता होत जातं आहे मात्र आईवडिलांची अपेक्षा काही कमी होण्यास तयार नाही.त्यासाठी सर्व मुला मुलींच्या आईवडिलांनी मोठ्या अपेक्षाच्या हट्टापायी एवढी मोठी भूमिका न घेता मुलीला तिच्या आयुष्याचा जोडीदार कसा हवा आहे हे शोधणे तितकेच महत्वाचे आहे.आणि त्यांना ते स्वतंत्र देऊन आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली पाहिजे.


        नक्कीच मित्रांनो हा माझा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर मला आपण कमेंट मध्ये नक्की कळवा पुढे देखील शेअर करा धन्यवाद.

ब्लॉगर - पवन साळवे(दौंड)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"