आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलोय आजचा ब्लॉग म्हणजे एका विषयाकडे हात घालणारा ब्लॉग आहे पण या ब्लॉगने काहींना मिर्ची लागणार तर काहींना हा ब्लॉग आवडणार पण मित्रांनो आवडो किंवा न आवडो दोन्ही विचार सरणीच्या लोकांनी या ब्लॉगचा अर्थ नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.आपण आजचा ब्लॉग हा देशात
कोण्ही कोणता रंग वापरायचा यावर होत असलेल्या राजकारणावर आहे.
आज देशात काही संकोचीत बुद्धीच्या लोकांची संख्या जास्तच वाढत असताना आपल्याला मिळत आहे.आणि त्या संकोचीत बुद्धीच्या लोकांनी देशात जाती धर्मावरून राजकारण सुरू केले आहे आणि ते म्हणजे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी(whatsapp university) मधून शिक्षण घेऊन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे.अर्थात फॉरवर्ड(Forward) मेसेज पसरवून हुशारी दाखवण्याचे काम सध्या होताना दिसत आहे.
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना लोकशाही प्रधान मानणाऱ्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत तर नाहीना असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे देखील आजच्या परिस्थितीतुन दिसून येत आहे. मुद्दा आहे तो शाहरुख खान यांची फिल्म पठाण(Pathan) येत आहे त्यावर बंदी घालण्यात यावी यासाठी पूर्णपणे जोर लावला देखील आहे.या फिल्म मधील बेशरम(Besharam) या गाण्यावर बंदी घालण्यात यावी ही त्या व्हाट्सएप युनिव्हर्सिटी(whatsapp university) वाल्या महाभागाणी मागणी केली आहे.
लोकशाही मार्गाने निवडणुकीत निवडून आलेल्या काहींनी थिएटर(Theater) जाळण्याची धमकी देखील दिली आहे मात्र अशा लोकांना अटक होताना फारसे काही दिसत नाही.हिंदू-मुस्लिम वाद लावण्याचा कट तर नाहीना असे देखील म्हणायला वावगे ठरणार नाही.भाजपचे नेते गिरीराज सिंह,नरोत्तम सिंह,अन्य लोकांनी देखील याला विरोध केलाय.पूर्वनियोजित हे कटकारस्थान आखून पठाण फिल्मला विरोध केला जातोय.
पठाण(Pathan) फिल्ममध्ये दीपिका पदुकोण या अभिनेत्री ने केसरी अथवा भगव्या कलरची बिकनी घातली असल्याने त्याचा विरोध केला जातोय कारण काही हिंदू संघटनांना वाटत आहे की हिंदू धर्माचा अवमान झाला आहे म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय मात्र या अगोदर देखील हिंदी फिल्म मध्ये अश्या रंगाच्या ड्रेस(Dress) घालून नृत्य केले गेले आहे मात्र त्यावेळी त्याचा विरोध केला गेला नाही.देशात फक्त धर्माच्या नावाखाली समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे.
जे.एन.यु(JNU) मध्ये दीपिका पादुकोन आंदोलन करणाऱ्या युवकांना भेट देण्यासाठी गेली होती म्हणून धर्माचे नाव घेऊन पठाण(Pathan) फिल्मला विरोध केला जात तर नाहीना व शाहरूख खान(Shahrukh Khan) मुस्लिम आहे म्हणून त्याचा विरोध ते केला जात नाहीना असे देखील प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.देशात दूषित वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक व लोकशाहीला विरोध करणारे लोक करीत आहे.
नागरिकांनी देखील आता सत्याच्या बाजूने उभे राहून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजणाऱ्याना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.रंगाने कोणता धर्म श्रेष्ठ होत नसतो तर चांगल्या विचाराने मैत्रिभावाने श्रेष्ठ होत असतो.समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावधगिरी बाळगावी सत्य घेऊन पुढे जावे "रंगात गुरफटून" जाता कामा नये.प्रत्येक व्यक्तीने धर्माने आपली एक ओळख दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या आहेत.प्रत्येक वेळी त्याला विरोध करून धर्माचे नाव बदनाम करण्यात काय अर्थ?तात्पर्य एवढेच धर्माच्या आड येऊन देशातील वातावरण दूषित करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.वेळीच सर्वांनी सावध राहावे हिंदू मुस्लिम शीख इसाई या मैत्रीभावाने एकसंघ व्हावे आपली सामाजिक एकजुटीता दाखवावी.
अगदी बरोबर आहे रंगात आणि जातीय तेढ निर्माण घडवून आणण्याचे षडयंत्र चालू आहे,
उत्तर द्याहटवावैचारिक लोकांनी एकत्र येण्याची गरज
हटवाRight
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा