नमस्कार मित्रांनो मी नवनवीन विषय ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे.आणि नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉग मधील विषय देखील आवडत असेल.आजचा विषय आपण तरुणाई व्यसनाच्या विळख्यात यावर बोलणार आहोत. आजची तरुणाई ही व्यसनाच्या आहारी जाताना पाहायला मिळत आहे.मात्र या तरूणाईवर कोणत्याही प्रकारचे अंकुश राहिला नाही हे स्पष्ट दिसत आहे.तरुणाई व्यसनाकडे जाण्याची अनेक कारणे आहेत.१)ज्या ठिकाणी आपण राहत आहोत त्या ठिकानवरील वातावरण.२)वाईट मित्रांच्या संगती.३)कॉलेजचा तास चुकवून फिरायला जाणे.४)घराचा दबाव नसणे मुलगा असो वा मुलगी जास्त लाडावणे.याच्या व्यतिरिक्त अनेक कारणे देखील असू शकतात.
एक दोन टवाळखोरं जमले की शिक्षण व्यवसायच्या चर्चा करणे सोडून तू कोणती दारू पिणार,तू कोणता ब्रँड घेणार,आशा प्रकारच्या उलटसुलट आयुष्याची वाट लावणाऱ्या विषयावर चर्चा करताना दिसतात.भविष्यात आपले ध्येय काय असावे पुढे जाऊन आपण काय केले पाहिजे या शब्दांच्या शृंखलेला झाकून टाकणे आणि बार्बादीच्या खाईत स्वतः जाणे हेच तर पाहायला मिळत आहे.
देशात विदेशी लोक काय करतायेत तसेच आपण देखील केले पाहिजे अशीच काहींची मानसिकता झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे.निवडणुका आल्या की हॉटेलवर जाणे दारू,सिगारेट सारखी व्यसने करणे,कोणत्यातरी क्षेत्रात आपण यशस्वी झालो किंवा अपयशी झालो तरी देखील व्यसनाच्या दिशेने वाटचाल करतायेत.दारू म्हणजे एक प्रकारची युवकांना फॅशनच वाटू लागली आहे.
व्यसनाकडे जाण्याची करणे आपण वर पहिलेच आहे तसेच बड्या बापांची मूल ही ड्रग्जकडे वळताना दिसत आहे.काहींना काळ्या पैशाचा उत आला आहे.युवक व्यसनाकडे जातोय त्याला घरची संस्कृती देखील कारणीभूत आहे.मुलगा शिक्षण घेतोय पण तो वयक्तिक जीवनात देखील काय करतोय हे देखील महत्वाचे आहे.युवकांच्या डोळ्यावर जे काही पैशाचे भूत जडलेले आहे ते वेळीच काढणे देखील जरुरी आहे.अन्यथा ही युवा पिढी ही देशाचे भवितव्य घडवू शकणार नाही हे तितकेच सत्य आहे.
बड्या बापांची मूल ड्रग्ज आणि हायफाई दारूकडे जाते तर सामान्य घरातील मूल ही कमी पैश्यात मिळणारी दारू व गांजा अश्या प्रकारची व्यसने करतायेत.अवैध नशा करणारी मादक पदार्थ आहेत त्यांच्यावर सरकारने देखील कारवाई करावी व युवा पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामावर लक्ष देणे आवश्यक आहे.
व्यसनाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी म्हटले तर वाढदिवस,३१ डिसेंबर, सुख दुःखाच्या ओघात येऊन व्यसन करणे,पास नापास,अशी अनेक कारणे आहेत.आपला देश हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो.जर देशातील तरुणाईला आपण व्यसनाकडे जाताना वेळीच रोखू शकलो नाही तर हे आपले दुर्भाग्य समजू.
देशाची उन्नती प्रगती ही तरुणाईवर अवलंबून आहे हे देखील आपण ध्यानात घेणे गरजेचे आहे. तरुण पिढीवर आपण अंकुश ठेऊ शकलो नाही तर देशाचं भविष्य प्रगतीच्या दिशेने नाही तर अदोगतीच्या दिशेने जाईल.तरुण पिढीला व्यसनापासून वेळीच रोखणे गरजेचे आहे.वेगवेगळे व्यसनमुक्ती ची कार्यक्रम ठेऊन त्यांना MOTIVATE करणे काळाची गरज आहे.
आता पुढेही देशाच्या तरुण पिढीसाठी नेते मंडळी अथवा पालक वर्ग काय करणार ते हे देखील कमालीचे ठरणार आहे.येणारा काळ हा तरुण पिढीचा असणार आहे.तरुण पिढीला योग्य ते मार्गदर्शन करणे आणि योग्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यावर जोर दिला पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा