"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

युवा पिढी जातीच्या कचाट्यात अडकत तर नाहीना?

        आता आपण पाहणार आहोत देशात आणि प्रत्येक राज्यातील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जात आहे ते.देशात राजकीय हालचाल ही फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपडच म्हणावी लागेल यात काही तिळमात्र शंका नाही. देशातील राजकीय परिस्थिती ही देश हिताच्या पहायला मिळत नाही तर समाजात द्वेष निर्माण करणारी परिस्थिती आपल्याला पहायला मिळत आहे.

        देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जी काही आर्थिक अडचण निर्माण झाली त्यावर कोणी प्रकाश टाकताना दिसायला तयार नाही तर त्या समाजामध्ये काय चालू आहे आणि त्यामध्ये कसे व्यत्यय आणता येईल यावर जास्त भर दिला जातोय आर्थिक टंचाई आणि वाढत्या महागाई वर मात्र राजकीय मंडळी शांत झालेली दिसतेय तसेच झोपेचे सोंग घेतले आहे की काय असे देखील म्हणता येईल.
         राजकीय मंडळी ही विकासाच्या दृष्टीने शून्य झालेली दिसत आहे मात्र समाजामध्ये तेढ निर्माण होणारी भाषणे करून दूषित वातावरण निर्माण केली जात आहे.राष्ट्रहिताच्या बाबी बाजूला ठेऊन टीका टिप्पणीच्या राजकारणाला जास्त जोर दिला जातोय पण आर्थिक चणचण भासत आहे ते मात्र कोणत्याच राजकीय नेत्यांना का दिसत नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतोय.

        देशात बेरोजगारी, महागाई,वाढते पेट्रोल डिझेल चे भाव यावर राजकीय नेते मंडळी मूग गिळून गप्प बसलेली पहायला मिळत आहे.निवडणुक जवळ येताच जनतेला खुश करण्यासाठी  कोणत्याही वस्तूची किंमत 3 ते 4 पैश्याने कमी करायची आणि वाढवताना मात्र 1 ते 2 रुपयाला जोर द्यायचा ही राजकीय सुरू आहे.

        तसेच शिक्षित युवा देखील धर्मांदाच्या विळख्यात अडकत चालला आहे.काही संकोचिंत बुद्धीचे राजकीय मंडळी शिक्षित युवकांची डोके भडकवून त्यांना दुसऱ्या दिशाने घेऊन जाताना दिसत आहे.जर शिक्षित युवा महागाई आणि आर्थिक चणचण भासत असणारया गोष्टीकडे वळला तर नक्कीच काही उपाय योजना होण्यास सुरुवात होईल अन्यथा राजकीय बेरोजगारी च झाड हे वाढतच जाईल.

        देशातील वाढत्या महागाईकडे सर्वांचे लक्ष असणे गरजेचे आहे मुख्यतो शिक्षित युवाने यावर जास्त भर द्यायला हवा.जातीपातीच्या राजकारणाने आपला आणि देशाचा विकास होणार नाही तितकेच सत्य आहे त्यासाठी देशात राजकीय मंडळीने जी काही द्वेषाचे बीज पेरले आहे त्याला वेळीच उखडून फेकणे मितीला गरज आहे.अन्यथा हे द्वेषाचे पेरलेले बीज कधी झाडात रूपांतर होईल हे सांगता येणार नाही.

        मुख्यतो युवकांनी स्वतःची आर्थिक परिस्थिती सुदरवणे गरजेचे आहे आपण यशस्वी होऊ तर समाज होईल व समाज झाला तर नक्कीच देश.जातीधर्माच्या भिंती तोडून सर्व समाज एक कासा होईल यावर लक्ष देखील दिले पाहिजे.देशातील जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे.त्यावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

        निवडणुका जवळ येताच जातीचे राजकारण सुरू होण्यास सुरुवात होतेय हे आपल्याला ज्ञात असणे महत्त्वाचे आहे.कोणत्या तरी एका माथेफिरू ला जवळ करणे आणि जातिजातीमध्ये कसे तेढ निर्माण होईल या गोष्टी शिकवणे व वाईट कृत्य करायला लावणे ही सध्या देशातील राजकीय नेत्यांनी निर्माण केलेली दृश्य आहेत.

        तात्पर्य एवढेच की देशात जातीवरून जे काही राजकारण चालू आहे त्याकडे युवा पिढीने लक्ष देणे गरजेचे आहे.समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना वेळीच आवरणे महत्वाचे आहे.महागाई, बेरोजगारी याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. नेत्यांच्या भाषणाला बळी न पडता देशाचा विकास कसा होईल यावर जास्त भर देणे गरजेचे आहे.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"