"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

दौंड मधील कलाकारांना माझी पण साथ.

                 दीपक पारदासनी सर
        दौंडमधील प्रसिद्ध हॉटेल सिटी इन दौंड येथे फिल्म शूटिंग संपन्न झाली.आयटम सॉंग चे अनावरण झाले.आणि आपल्या दौंडचे नाव रोशन करणारे आमचे स्नेही दीपक पारदासनी सर,प्रवीण धर्माधिकारी सर,मंगेश साठे सर,यांच्या माध्यमातून दौंडमधील कित्येक नृत्य कलाकार यांना त्यांच्या माध्यमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये जाण्याची संधी मिळत आहे.नक्कीच यांच्या माध्यमातून कलाकारांना जी संधी मिळत आहे ती अविस्मरणीय आहे नक्कीच दौंडमधील सर्व जनता त्यांना भरभरून प्रेम देतील अशी अपेक्षा करूया.आज सध्य परिस्थितीत फिल्म इंडस्ट्रीज मध्ये जाण्यासाठी आणि जागा मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि काही लोक यशस्वी होतात व काही अपयशी होतात पण त्या अपयशाला झुगारून यशस्वी कसे होईल यासाठी काही लोक प्रयत्न करीत असतात.आणि त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे आपल्या दौंडचे नृत्य कलाकार त्यांनीही आपल्या माध्यमातून तळागाळातील कलाकारांना वरती आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
        प्रविण धर्माधिकारी सर
        कलाकाराला जात पात नसते ती फक्त एक कला असते आणि त्या केलेला कश्याप्रकारे वाव द्यायचा हे यांच्या माध्यमातून समजत आहे.प्रत्येक वाड्यावस्तीमध्ये एक ना एक कलाकार असतो तो नृत्य,गायक,पेंटिंग, असो व अनेक प्रकारचे कलाकार असो पण या सर्व कला असताना सुद्धा त्या कलेलाल वाव देण्यासाठी व प्रसिद्धी देण्यासाठी एक मार्गदर्शक असावा लागतो आणि त्या वाडीवस्तीमधील कलाकार बाहेर काढण्यासाठी त्या मार्गदर्शकाने प्रयत्न केले पाहिजे असे म्हणतो पण असे खूप मार्गदर्शक असतात ते फक्त कलेला आपले आयुष्य मानतात व जो कलाकार आपल्या ध्येय उधिष्टे गाठण्यासाठी पात्र असतो त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हे मार्गदर्शक प्रयत्न करीत असतात.आपला पैपैका जमा करून हे मार्गदर्शक आपल्या माध्यमातून नवनवीन कलाकार घडवत असतात आणि ज्या क्षेत्रात जो कलाकार आपल्या स्थानिक पातळीवर कलाकार घडवण्याचे कार्य करीत असेल तर तेथील सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी सर्वोतोपरी मदत केलीच पाहिजे कारण गावखेड्यातून शहरात आणि फिल्म इंडस्ट्रीज मध्ये हे कलाकार पोहचू शकेल आणि सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनी आर्थिक स्वरूपात मदत करून त्या सर्व कलाकारांना पाठबळ देणे गरजेचे आहे. पाठबळ न मिळाल्याने काही कलाकार आपली प्रगती करू शकत नाही.नक्कीच या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व जनतेनी आपापल्या परीने मदत केली तर अशक्य ते शक्य करू शकतील हे कलाकार.
       मंगेश साठे सर


प्रत्येक क्षेत्रात पैसे अभावी विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही परंतु अश्या गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले तर नक्कीच दौंडचे आणि आपल्या महाराष्ट्राचे नाव रोशन होण्यासाठी वेळ लागणार नाही.काही कलाकार आपली कला दाखवण्यात माहीर असतात परंतु कला दाखवत असताना अडचण येती म्हणजे घरची परिस्थिती व घरची जबाबदारी जेव्हा जबाबदारी पडते तेव्हा हे कलाकार आपल्या कलेपासून दूर दूर जातात.त्यांच्याही घरची परिस्थिती ची तमा न बाळगता आपल्या दौंडच्या जनतेच्या मनात घर करण्याची धडपड व दौंडचे नाव रोशन करण्यात व्यस्त असतात.जर आपण सर्वांनी आपली नैतीक जबाबदारी म्हणून या कलाकारांना वाव दिले तर नक्कीच दौंडचे नाव रोशन होईल.दौंडमध्येही असे कित्येक कलाकार होऊन गेले की ते आपल्या परिस्थितीला लाजून कलेपासून दूर झाले नक्कीच अश्या या कलाकारांना दूर जाऊ न देता त्यांना एक धीर दिला पाहिजे.कलाकार हा आपल्या प्रेमाने व स्तुतीने एनर्जी तयार करून त्यांची पुढे जाण्याचे मनोबल तयार होते.नक्कीच माझा हा ब्लॉग वाचून दौंडमधील व महाराष्ट्रातील जनता आपल्या घरा शेजारी व आपल्या एरियातील कलाकारांना योग्य ते सहकार्य करून त्यांना पुढे जाण्याची संधी देतील व त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याची पुरेपूर माहिती घेऊन त्यांना त्या प्रकारे मदत करतील व योग्य ते सहकार्य करतील अशी आशा करूया आणि गावखेड्यातून आलेल्या कलाकारांना सहकार्य करूया.

टिप्पण्या

  1. ही माहिती वाचून कलाकारांना नक्कीच सर्वजण मदत करतील.

    उत्तर द्याहटवा
  2. दिपकसर,मंगेशभाऊ,तसेच प्रविणदादा तुम्हां सर्वांची मेहनत वाया जाणार नाही.परमेश्वर तुमच्या सदैव पाठीसी उभा आहे.फक्त कर्म करीत रहा.एक दिवस दौंडच नव्हे तर सर्व जनता तुम्हांला डोक्यावर घेऊन नाचतील.लढते रहो भाईजान!

    उत्तर द्याहटवा
  3. मंगेश भाऊ तसेच इतर कलाकार याना आम्ही दौंड कर नेहमी पाठबल देत राहु ,सर्वाना पुढील वाटचाल करीता शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  4. Thanks pavan 🙏
    *तुझी धडपड ,तुझी जिद्द ,आणि तुझे कष्ट ,या ब्लॉग द्वारे काही कमी शब्दात खूप काही बोलून गेलास!*
    Love you Yaar❤️🤝

    उत्तर द्याहटवा
  5. सर्व कलाप्रियजनांप्रती..
    आदर,अभिनंदन,अभिमान आणि मनःपुर्वक शुभकामना !��������

    उत्तर द्याहटवा
  6. तुम्हा सगळ्यांना नक्कीच यश मिळेल,कारण तुम्ही सगळे तेवढी मेहनत घेताय.तुमच्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे, आणि एके दिवशी आता आहे त्या पेक्षा अजून यशस्वी होताल आपल्या दौंड चे नाव अजून रोशन करताल, हि ईश्वर चरणी प्रार्थना 😊🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"