आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देशात होत असलेल्या दूषित राजकारण संदर्भात बोलणार आहोत.देशात
महागाई आणि शिक्षणाचे बाजारीकरण यावर आपण प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.
भोंग्याकडे लक्ष आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष.आजच्या ब्लॉगचा शीर्षक आहे.चला तर पाहूया शिक्षण आणि भोंगा नेमकी भानगड काय आहे ते.
देशातली राजकीय परिस्थिती ही दूषित झालेली पहायला मिळत आहे.धर्माच्या नावखाली काही राजकीय नेते मंडळी आपली राजकीय भाजत आहे त्यात संकोचिंत बुद्धीचे कार्यकर्ते हे कोणताही विचार न करता हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरत आहे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की पोलीस अपली कारवाई करून परिस्थिती बिघडवू टाकणाऱ्या टोळीवर गुन्हे देखील दाखल करीत आहे.नंतर कार्यकर्ते कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात बिझी होतायेत.
देशात धर्माच्या नावाखाली युवकांची डोके फिरवून भलत्याच खाईत ओढण्याचा काम सध्याची राजकीय वातावरण करत आहेत.कोरोनामुळे आर्थिक मंदी आली यावर कोणीही ब्र काढला नाही मात्र भोंगा आणि हनुमान चालिसा मध्ये अडकवून ठेवत आहे.देशातील वाढती महागाई वरून जनतेची दिशाभूल तर करीत नाहीना असे देखील बोलण्याची वेळ येत आहे.
कित्येक वर्षांपासून देशात सर्व जाती धर्माचे एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहे मात्र ही राजकीय नेतृत्व करणारी मंडळी द्वेष पसरवण्याचे काम का करीत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो कोणी ज्या समाजात जन्माला येतो त्याचा उद्धार करणे हे त्याचे अध्यकर्तव्य आहे जगातील महान महापुरुष असे सांगत असेल तर सध्याचा राजकीय नेते मंडळी चे भाष्य ऐकून युवक का भडकत आहे? हे देखील शोधण्याची गरज आहे.
देशातील ग्रामीण भागात अजून देखील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे डिजिटल इंडिया म्हणवून घेणाऱ्या देशात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि देशातील महापुरुष यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे.मुलांना शाळेत पाठवा योग्य शिक्षण द्या असे मोलाचे मंत्र दिले असून देखील सध्याची राजकीय परिस्थिती ही धर्माच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजण्यात व्यस्थ आहे.
देशातील युवकांची माथी फिरवून अराजकता माजवण्याचं काम काही लोक करीत आहे.यावर मस्जिद समोर भोंगा लावा आणि हनुमान चाळीसा लावा असून वक्तव्य करून देशातील परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.देवी देवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात आहे.आज सर्व TV चॅनल्स वर महागाई आणि शिक्षण या संदर्भात कोणत्याही प्रकारची बातमी पाहायला मिळत नाही. भोंगा आणि हनुमान चाळीसा पहावयास मिळत आहे.
जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय उपययोजना केल्या पाहिजे यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.आर्थिक मंदी वर उपाययोजना केल्या पाहिजे.आर्थिक मंदी, शिक्षण, महागाई यावर पडदा टाकण्याच काम म्हणजे भोंगा आणि हनुमान चाळीसा असच म्हणायला काही हरकत नाही.
देशात द्वेष भावना निर्माण होणारे भाष्य करणाऱ्यांर कारवाई होणे गरजेचे द्वेष भावना निर्माण करणे आणि युवकांची डोकी भडकवणे हे काम करणाऱ्या महाशयावर करवाई झाली पाहिजे.दुसऱ्या समाजाच्या विरोधात काही गरळ ओकने आणि युवकांना रस्त्यावर येण्यास सांगणे ही राजकीय खेळी नाही तर दंगली भडकवण्याची खेळी म्हणता येईल.
मित्रांनो या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करण्याच काम आम्ही केले आहे.देशात हे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना मदत करा भोंगा तुमचं आयुष्य बदलवणार नाही तर शिक्षणानेने तुमचं आयुष्य बदलणार आहे.त्यासाठी खूप लोक येतील तुम्हाला भडकवतील तुम्ही तुमच्या एकाच निर्णयावर ठाम रहा शिक्षण शिक्षण शिक्षण भोंग्याकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष द्या आणि विद्यार्थ्यांना मदत करा.नक्कीच आपण भोंग्याला बळी पडणार नाही याची अपेक्षा करूया.
बरोबर आहे
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाज्वलंत प्रश्नावर प्रकाशझोत टाकला आहे पवन सर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया आल्याने आमचे मनोबल वाढते असेच सहकार्य राहुद्या
उत्तर द्याहटवाVery Nice
उत्तर द्याहटवादेशातील आर्थिक मंदी, महागाई, खाजगीकरण, बेरोजगारी शिक्षण या विषयावर कोणताही नेता बोलत नाही. मात्र या विषयावरील नागरिकांचे लक्ष विचलीत करुन, जाती जाती मध्ये तेढ आणि द्वेष भावना निर्माण करण्याचा कुटील डाव आहे असं म्हणायला वाव आहे.
उत्तर द्याहटवाKhup chan mahiti dili sir.nakkich sarvanni yogya dishene janyachi garam ahe
उत्तर द्याहटवातरुणांनी या विषयावर अधिक गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे.. Good keep it up.
उत्तर द्याहटवा