आज आपण एक आगळ्यावेगळ्या विषयाकडे लक्ष देण्याची छोटासा प्रयत्न करणार आहोत.पुनर्विवाहला
पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.महिलांनी पुनर्विवाह केला पाहिजे का नाही यावर आपण थोडा विश्लेषनात्मक मुद्देसूद चर्चा करणार आहोत.चला तर पाहूया पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का.महिलांवर पुरुषांकडून होणारा अत्याचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी व उपाय.अडचणी निर्माण का होतात आणि त्या झाल्यावर त्यावर उपाय काय करावे लागतील हे देखील पाहण्याची गरज आहे.
विवाह झाल्यानंतर पती पत्नी मध्ये वाद हा होतच असतो वाद हा कशामुळे होतो हे देखील पाहणे काळाची गरज छोटा वाद हा किती विकोपाला जाऊ शकतो हे सर्वांना ज्ञात आहे.एकमेकांची मन जुळणे हे मुलीचे किंवा मुलाचे लग्न त्यांच्या इच्छा नसताना देखील करणे किंवा दोघांचे लग्ना अगोदर कोणाशी प्रेम सबंध असणे हे देखील कारणे असू शकतात.अगोदर लग्नाआगोदर घडलेल्या घटना विसरून जीवनाची वाटचाल करणे हेच योग्य अन्यथा संसार सुखाचा होऊ शकत नाही.
एकमेकांवर संशय घेणे तू त्याच्या सोबत का बोलली तू त्याच्या सोबत का बोलला ज्या गोष्टी नसतात त्याच पुन्हा पुन्हा काढून मानसिक त्रास देखील होऊ शकतो व एकमेकांच्या संशयाने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.व सोडचिठ्ठी पर्यंत देखील निर्णय होऊ शकतात नात्यात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी एकमेकांची मने जुळणे खूप महत्वाचे आहे.तसेच स्त्री जातीवर काही बंधने लादले जातात आणि आत्ताची शिक्षित महिला हे सहन करू शकत नाही.स्त्री जातीवर बंधने लादून माझ्या आदीपथ्यखाली काम केले पाहिजे असा काही पुरुषांचा समज आहे आणि आत्ताची महिला सहन करू शकत नाही कारण ती शिक्षित आहे.
यदाकदाचित सोडचिठ्ठी झाल्यावर महिलेने काय करावे हा प्रश्न परिवार व तिच्यावर निर्माण होतो.समाज काय म्हणाले नातेवाईक काय म्हणेल अश्या अनेक समस्या मनामध्ये भेडसावत असतात.त्या महिलेला देखील आपल्या आयुष्याचा गाढा पुढे घेऊन जायचा आहे म्हटल्यावर पुनर्विवाहसाठी पाऊल तर उचलण्याची गरज तर आहेच.पुनर्विवाह करण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी धाडस देखील हवा आहे. कारण प्रत्येक महिलेला अशा असते की आपला जोडीदार हा आपल्याला समजावून घेणारा असावा आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारा असावा समाज काय म्हणेल यावर जोपर्यंत आपण पडदा टाकणार नाही तोपर्यंत सुखाचा आणि आनंदाचा संसार पुढे जाऊ शकत नाही.
समाजात वावरत असताना घटस्फोट झालेल्या महिलेला अनेक समस्येला तोंड द्यावे लागत.मात्र आपल्या जीवनात आनंद पुन्हा एकदा यावा आणि आपल्या मनासारखा जोडीदार भेटवा ही प्रत्येक महिलेची इच्छा असते मात्र अगोदर घडलेल्या घटनेने पुनर्विवाह करण्यासाठी देखील धाडस होत नाही हे तितकेच सत्य आहे.हिंदू कोड बिलाने महिलांसाठी अनेक दारे उघडी झाली आणि ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिली त्याप्रमाणे महिलांना स्वतंत्र आहे त्याच प्रमाणे त्यांना जगता आले पाहिजे.मात्र अजून देखील महिलांवर पूर्वी ज्या घटना होतायेत त्याच प्रमाणे आता देखील करायला पाहत आहे.पण महिलांच्या धाडसी वृत्तीमुळे महिला त्या अत्याचाराला पायदळी तुडवताना दिसत आहे.
महिला आता सक्षम झालेली आपल्याला पहायला मिळत आहे स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार करू शकतात ते म्हणजे भारतीय संविधान ने दिलेल्या हक्क अधिकारामुळे.त्यासाठी ज्या महिलांनी घटस्फोटचा जो निर्णय घेतला त्या महिलांनी लग्न झालेल्या अन्याय अत्याचाराला विसरून पुन्हा एकदा आपल्या नवीन आयुष्याला कलाटणी दिली पाहिजे.सारखे सारखे झाले गेल्याला गोष्टी आठवून आपण आपल्या मनात सामावून न घेता पुढे नवीन आयुष्यात कशाप्रकारे वाटचाल करावी याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुर्णविवाह यावर काहीप्रमाणात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच आपणाला हा ब्लॉग आवडेल नक्कीच ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्यांनी खचून न जाता आपल्या आयुष्याची वाटचाल कशाप्रकारे करावी यामध्ये आपण थोडे मुद्दे मांडले आहेत.खरोखर आपल आयुष्य आहे कसे जगायचे हे आपल्या हातात आहे त्यासाठी होणाऱ्या अत्याचराचा प्रतिकार करणे अन्याय सहन न करता त्याचा मुकाबला करत रहा.खरोखर आपण यामधून काही बोध घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि ब्लॉग कसा वाटला त्यासाठी आपण कमेंट मध्ये कळवा.
बरोबर
उत्तर द्याहटवाधन्यवाद. तुमची प्रतिक्रिया म्हणजे ब्लॉग नक्कीच चांगला आहे
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवा