"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

मानवी जीवनावर मोबाईलचा दुष्परिणाम होतोय?

        मित्रांनो आपण आज मानवी जीवणार मोबाईलचा दुष्परिणाम होतोय? का या संदर्भात बोलणार आहोत त्याचे फायदे आहे की तोटे हे देखील आपण पाहणार आहोत.
        मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक समस्या उद्भवत आहे आणि त्याला आपण कारणीभूत आहोत मोबाईलचा अतिवापर हा आपल्या मानवी जीवनावर आणि शरीरावर त्याचा परिणाम होतोय का? आणि होत असेल तर आपण काय केले पाहिजे? हे देखील आपण पाहायला हवे कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याचा मार्ग देखील असतो याचा देखील मार्ग आहेच पण तो काय आहे यावर आपण प्रकाश टाकणे जरुरी आहे.

        कोरोनाच्या महामारी ने देशात थैमान घातले आणि सर्व रोजच्या गरजांवर त्याचा परिणाम होऊ लागला आणि झालाच अस देखील बोलले तर काही वावग ठरणार नाही.विद्यार्थ्यांची शाळा बंद,त्यांचे खेळ बंद झाले आणि मूल मोबाईल मध्ये डोकावू लागले आणि त्यालाच आपले कायमचे आयुष्य बनवून टाकण्यास तयार झाले.ज्या प्रकारे अन्न वस्त्र निवारा जनतेच्या गरजा बनल्या आहेत त्याच प्रकारे आता यामध्ये मोबाईल चा देखील समावेश झाला अस देखील म्हणता येईल आणि ते तितकेच सत्य देखील आहे.

        मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थी हे शिक्षणापासून  दूर झालेत,आणि मोबाईलच्या दुनियेत सामील झालेत ही सध्याच्या युगाची सत्य परिस्थिती आहे.लॉकडाऊनने ज्या प्रकारे शाळा,कॉलेज वर पूर्णविराम आला आणि विद्यार्थ्यांचे जग हे मोबाईलमय झाले.मोबाईलच्या वापरामुळे परिवारात दुरावा झाला,रोजचे संभाषण बंद झाले,विचार करण्याची क्षमता देखील कमी झाली,बायको मोबाईल वापरते म्हणून घटस्फोटचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे.

         मोबाईलचे फायदे आपण पाहूया.
१) ई-मेलद्वारे आपण एका ठिकानवरून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित रित्या संदेश आणि डॉक्युमेंट पाठवू शकतो.

२)एका व्यक्तीला आपल्याला संपर्क करायचा असेल तर आपण मोबाईलद्वारे त्याच्याशी संपर्क करून आपण बोलू शकतो.

३)ऑनलाइन आपण वस्तूंची खरेदी विक्री करू शकतो.

४)ऑनलाईन आपण अन्न मागवू शकतो.

५)जर आपल्याला दुसऱ्याच्या बँक अकाऊंट मध्ये पैसे पाठवायचे असेल तर आपण मोबाईलद्वारे पैसे पाठवू शकतो.

६)प्रसिद्धी मिळवण्यासाठी देखील याचा वापर होतो आहे फोटो पाठवणे व्हिडीओ पाठवणे मेसेज पाठवणे इत्यादी.

७)घड्याळ,अलार्म,कॅलेंडर, अन्य साधनांचा वापर मोबाईल द्वारे आपण हाताळू शकतो.

८)फोटो एडिट करून सोशल मीडियावर अपलोड करू शकतो.

९)आपण अगोदर काही महत्वाच्या गोष्टी वही जमा करून ठेवायचो आता मोबाईल आल्याने एका क्लिवर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतो.

१०)आपल्या अन्य एका ठिकाणावर जायचे असेल तर GPS वापर करून त्या ठिकाणी पोहचू शकतो.अजून अनेक काही फायदे आहेत.

                   मोबाईलचे तोटे पाहूया.
१)मोबाईलच्या वापरामुळे परिवारातला रोजचा संवाद कमी झाला.

२)विद्यार्थी अगोदर खेळामध्ये तल्लीन असायचे आता मोबाईल असेल तर खेळ देखील विसरले जाऊ लागले आहे.

३)डोळ्यांचे त्रास अर्थात दुरदृष्टी कमी होणे.

४)मोबाईलच्या वापरामुळे वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि त्याने होत असलेले अपघात.

५)मोबाईलच्या अतिवापर झाल्याने विद्यार्थी शिक्षणाने पंगू झालेला आहे.

६)मोबाईल मध्ये सेव्ह केलेल्या डेटा हॅक होण्याची भीती.

७)मोबाईल वापरामुळे स्मरणशक्ती कमी होणे.विसरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

८)सारखे सारखे मोबाईल हाताळणे हा देखील मानसिकतेवर झालेला मोबाईलचा अतिवापर आहे.

9)मोबाईलच्या वापरामुळे डोकेदुखी वाढत आहे.डोळ्यांत आग सुटणे असे अनेक प्रकार यामध्ये आहे.

        आपण मोबाईलच्या माध्यमातून होणारे फायदे आणि तोटे आपण पाहिले आहेत अश्या अनेक समस्येतून बाहेर येण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे वापर कमी करणे आपण पाहू शकतो अधिकाधिक मोबाईलचा वापर सर्वच  गोष्टीसाठी होतोय.मोबाईलमुळे शरीवर जे काही दुष्परिणाम होत आहेत त्यावर आळा आणण्यासाठी मोबाईल वापरणे बंद करणे हा उपाय नाही तर त्याचा अतिवापर टाळणे महत्वाचे आहे.

        

        

टिप्पण्या

  1. धन्यवाद सर तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया माझे मनोबल वाढवत आहे.असेच सहकार्य निरंतर राहुद्या.

    उत्तर द्याहटवा
  2. खरं आहे, मी पण प्रयत्न करेल कि मोबाईलचा कसा कमीत कमी वापर होईल...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"