आज आपण तरुण पिढी संदर्भात काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरच तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाने घडतेय? ऑफलाईन शिक्षणच तरुण पिढीच्या ज्ञानात भर पाडू शकते?या आदी विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत. आजचे तरुण युवक कोणत्या मार्गाला जात आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच.भारत देश हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जात आहे.नक्कीच आजची तरुण पिढी ही योग्य मार्गाने जात आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.आजची तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल मध्ये वेगळेच कारनामे करतायेत आणि त्याला जबाबदार आहे सरकारी यंत्रणा.
ऑनलाइन शिक्षण हे नावापुरते राहिलेले पहावयास मिळत आहे.ऑफलाईन शिक्षण हे विध्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भर टाकण्यास तत्पर होती.विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाने विचाराने कमकुवत होत चाललेला दिसत आहे.विद्यार्थी दहावीत गेला तरी मराठी वाचण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर देशाचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे.
ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आलेला 40 टक्के विद्यार्थी अजून देखील अज्ञानी दिसत आहे.दहावीच्या वर्गात गेला असून देखील वाचायला येत नसेल तर देशाचं भविष्य ऑनलाईन शिक्षणाने बरबाद होत चालले आहे असे म्हणायला काही वावग ठरणार नाही.तरुणाईचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातच तरुणाईला वाचायला येत नसेल तर देश महासत्ता होईल? हा देखील प्रश्न जनते समोर येत आहे.
कोरोनाच्या महामारीने देशावर आर्थिक संकट आले लॉकडाऊन घोषित करून सर्व उदयोग व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम झाला.आणि त्यात तरुणाईचा देश म्हणून संबोधले जाणाऱ्या तरुणाईवर मोठा आघात झाला तो म्हणजे ऑफलाईन शिक्षणाला पूर्णविराम लागून आज तागायत देशातील तरुणाई अज्ञानाच्या खाईत जाऊन जगताना आपल्याला पहायला मिळत असेलच.
आज कित्येक तरुणांना ऑनलाईन शिक्षणामुळे व्यवस्थित मराठी वाचण्यास अवघड वाटत आहे तर इंग्लिश ची काय दशा असेल हे देखील महत्वाचा मुद्दा देशात उपस्थित होतोय.त्याला कारणीभूत ऑनलाईन गेम,ऑनलाइन रम्मी(जुगार) व्हिडीओ एडिट करून सोशल मिडिया वर अपलोड करीत बसणे या अश्या गोष्टीकडे तरुणाईचे लक्ष वेधले जात आहे.
आई वडील यांना आपले पाल्य काय करतायेत हे लक्ष देण्यास वेळ नसल्याने तरुणाई या ऑनलाइन शिक्षणाचा गैरवापर करीत आहे.ऑफलाईन शिक्षण घेत असताना शिक्षक वर्ग तरुण वर्गाकडे लक्ष देण्यास तत्पर असतात.तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांना नवनवीन अँड्रॉइड मोबाईल दिले जातात मात्र त्याचा तरुण वर्ग कशाप्रकारे वापर करीत आहे हे पाहण्यासाठी कोणाकडे वेळ नाही.
तात्पर्य एवढेच की ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली तरुणाई चुकीच्या मार्गाला गेली आहे त्याला मुख्य प्रवाहात कसे आणायचे ही महत्त्वाची अग्नी परीक्षा आहे.तरुण वर्ग मुख्य प्रवाहात तेव्हाच येईल जेव्हा ऑफलाईन शिक्षणाला पुन्हा गती प्राप्त होईल.ऑफलाईन शिक्षण सुरू होण्यास सुरुवात झाली की तरुण मंडळी कडून मोबाईल देणे टाळावे तरच ऑफलाईन शिक्षणाचा फायदा होईल अन्यथा परिस्थिती जैसे थे राहील.
बरोबर आहे.online शिक्षणामध्ये पालक जर त्यात सहभागी होऊन पाल्या सोबत बसले तर हा प्रकार च घडणार नाही. पालकांना वाटते की शिक्षकांनेच सर्व जबाबदारी घेतली पाहिजे तसे नाही.तर पाल्य इतर वेळेस पालकांना सोबत च वेळ घालवत असतो.offlie शिक्षणात सुध्दा जर पालक व शिक्षक यांचे संभाषणच नसेल तर पाल्य तेव्हा ही अशाप्रकारे अभ्यासाकडे लक्ष देत नाही व बाहेर भटकत राहतात. पालकांची ही जबाबदारी online असो offline दोन्ही कडे असलीच पाहिजे शिक्षक हा फक्त जास्तीत जास्त 6तास पाल्यासोबत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाला दोष न देता ती किती सदोषमुक्त शिक्षण पध्दत करता येईल.त्याकडे लक्ष द्यावे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद तुम्ही खरी खंत यामध्ये व्यक्त केली.
उत्तर द्याहटवाशिक्षणाचे व्यापारीकरण थांबवले पाहिजे, आज किती तरी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत यावर कुणीही बोलायला तयार नाही.एकंदरीत शासनाचे शाळा वर नियंत्रण असायला पाहिजे, म्हणजे ऑनलाइन की ऑफलाईन शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही.
उत्तर द्याहटवाआपले मत व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिले
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर असेच सहकार्य निरंतर राहुद्या आणि पुढेही शेअर करा
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवा