नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन विषयावर प्रकाश टाकणार आहोत देशात जिथे तिथे जातीचे आणि धर्माचे राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याला मुख्यतो जबाबदर कोणाला मानायचं हे अजून देखील कोणाला समजले नाही. जो तो उठतोय आणि बोलतोय माझ्या धर्मावर संकट आले आहे म्हणून आम्ही काही गोष्टींना विरोध करीत आहोत.मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये कोणत्या धर्माचा अथवा समाजाचा उल्लेख करणार नाही मी जो हा ब्लॉग लिहीत आहे तो वाचत गेल्यावर पुढे समजेल मला या ब्लॉगच्या माध्यमातून देशातील तरुणांना काय मेसेज द्यायचा आहे तो.चला तर आपण आपल्या मूळ मुद्याला हात घालूया.
मित्रांनो देशात आर्थिक मंदीच्या दिशेने देश वाटचाल करताना दिसत आहे पेट्रोलच्या किमती खाद्यपदार्थ यांच्या किमती गगनाला भिडले असले तरी देशातील राजकीय नेते मंडळी आपल्या स्वार्थापायी यावर पडदा टाकताना आपण पाहत आहोत महागाई का वाढत आहे यावर मात्र कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.महागाई वाढत आहे मात्र प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांना युवकांना त्यांच्या पूर्वीच्या पगारावरच अवलंबून राहत आहे त्याकडे मात्र कोणी लक्ष देण्यासाठी तयार नाही.आणि ज्या युवकांना रोजगार नाही ते युवक राजकीय नेत्यांच्या भडकावू भाषणावर खुश होऊन दंगलीच्या दिशेने जात आहे.त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणाची आहे? प्रश्न देखील उपस्थित होतोय.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांची माथी भडकवण्याची कामे या देशात होताना दिसत आहे.जो तो राजकीय पक्षाचा नेता युवकांना जवळ करून त्यांना कोणत्या दिशेने घेऊन जातोय हे देखील तपासून पाहणे गरजेचे आहे. धर्माच्या जखड्यात अडकवून इमोशनल करून त्यांना दंगलीच्या खाईत ओढण्याच काम सध्याची राजकीय परिस्थिती करीत आहे. यांची मूल परदेशात शिक्षणासाठी आणि देशातील युवा पिढी यांच्या मागे झेंडे घेऊन फिरण्यासाठी कंठ दाटून ओरडण्यासाठी माझा धर्म संकटात आहे हे बोलण्यासाठी.अजून देखील शहरात व ग्रामीण भागात अभ्यासिका नसल्या कारणाने शिक्षण त्यांना अवघड जात आहे.पण हे राजकीय मंडळी समाजसमाजामध्ये भेद निर्माण करून त्यांच्यात दुफळी निर्माण करीत आहे.हे कुठेतरी थांबवणे गरजेचे आहे.
संधीसाधू नेत्यांचा कल युवा पिढीकडे जास्त दिसत आहे कारण सळसळत रक्त कोणालाही ऐकणार नसत आणि एक जाहीर सभा घेतली आणि काही भडकवू भाषण केले की युवा पिढी आहेच धर्मावर आणि जातीवर शिव्या देण्यासाठी तयार.युवा पिढीकडे जोपर्यंत राजकीय पक्ष लक्ष देत नाही तोपर्यंत कोणत्याच परिस्थितीत जातिद्वेष थांबणार नाही.धर्माच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजून आपली घरे कसे भरू यावर जास्त भर दिला जातोय.ज्या युवकांना रोजगार हवा आहे त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे आणि जे शिक्षणाच्या प्रवाहात नाही त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली पाहिजे.धर्माने आणि जातीने कोणाचे आयुष्य बदलणार नाही तर ते बदलणार फक्त शिक्षणाने. त्यासाठी युवा पिढी दंगलीच्या खाईत जाऊ न देता त्यांना त्यातून कसे बाहेर काढता येईल यावर लक्ष देखील देणे गरजेचे आहे.
देशातील युवा पिढीला लवकर योग्य ते मार्गदर्शन भेटले नाही तर देशाची परिस्थिती बिकट होऊ शकते. कारण जो तो उठून धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन डोळ्यावर काळी पट्टी लावून निघाला आहे कारण त्याच्या मेंदूवर धर्माची अर्धवट माहिती पुरवली आहे.त्यासाठी तो जवळ्या विशिष्ट जातीच्या मित्राला देखील तो आपला शत्रू मानत आहे.कारण त्यावर जातीचा आणि पगडा पेरला आहे.माणुसकी महत्वाची का धर्म हाच युवा पिढी समोर प्रश्न येऊन ठेपला आहे.त्यावर लवकर आळा घालून समाजप्रबोधन करणे महत्वाचे आहे.
मित्रांनो देशातील युवा पिढी ही शिक्षित करून त्यांना जातीचे आणि धर्माचे धडे देण्याची गरज नाही आपल्या शिक्षणाने देशाला कितपत फायदा आहे आणि आपल्याला त्याच्यापासून काय फायदा आहे पाहणे गरजेचे आहे. जातीने किंवा धर्माने तुमचा आणि देशाचा विकास होणार नाही तर तो विकास होणार तुमच्या शिक्षणाने त्यासाठी युवकांना दंगलीच्या खाईत जाण्यापासून रोखणे काळाची गरज आहे.देशाची राजकीय परिस्थिती चांगली असेल तर देशाचा विकास नक्कीच होणार. मित्रांनो माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आहे यावर आपण आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि यापुढेही मी कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिला पाहिजे यावर नक्की कळवा धन्यवाद.
माणुसकी आणि स्वाभिमानी या विषयावर लिह ब्लॉग.
उत्तर द्याहटवानक्कीच
उत्तर द्याहटवाबरोबर
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा