"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

विश्वास ठेवत असाल तर ठेवा पण पूर्ण झोकू नका

         नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज ब्लॉक लिहिण्यासाठी वेळ भेटला आणि आज आपण महत्वपूर्ण विषयाकडे वळणार आहोत त्यासाठी ब्लॉग लिहीत असताना वाचकांना काय हवंय हे देखील पाहिले पाहिजे आणि सध्या मितीला रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडीवर जाऊनच मी हा ब्लॉग लिहितोय आणि नक्कीच तो आपल्याला देखील हीच अपेक्षा करूया.

         प्रत्येकजण जीवनात अनेक समस्येशी झगडत असतो आणि त्यातून देखील तो मार्ग काढत असतो मात्र काही प्रसंग असे देखील येतात त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी त्याची इच्छा शक्ती नसते आणि ती ईच्छा शक्ती निर्माण करण्यासाठी त्याला कोणाचा ना कोणाचा आधार तर घ्यावाच लागतो त्यासाठी अडचणींना सामोरे जात असताना त्या अडचणींवर मात करणे देखील त्याच्यासाठी ही एक महत्वाची परीक्षा असते आणि त्यात काही लोक पास देखील होतात आणि काही लोक त्यात अपयशी देखील ठरू शकतात (मी ठरू शकतात म्हणलोय)लक्षपूर्वक वाचण्यावर भर द्या विनंती.
        जीवनात काही व्यक्ती रागिष्ट स्वभावाचे असतात तर काही शांत स्वभावाचे असतात आपण रागिष्ट आणि शांत स्वभाव यातला अंतर पाहणार आहोत रागिष्ट काय करतात आणि शांत स्वभावाचे काय करतात माझ्या मते रागिष्ट स्वभावाचे लोक अनेकांना टोचत असतात असं म्हणायला काही हरकत नाही कारण रागिष्ट स्वभावाचे लोक जे ओठावर आहे ते बोलून मोकळे होतात आणि त्यांनाच चुकीचं मानलं जातं आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात हे माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे असे देखील बोलू शकतो.कारण तडकाफडकी बोलणारा व्यक्ती कधीच धोकेबाज नसतो त्या व्यक्तीला सर्वकाही माहिती असताना देखील तो आपले काम करत असतो कारण स्वभावात बदल होऊ शकत नाही कारण आपण कोणाचे गुलाम नाही हाच त्याचा एक उद्देश असावा.

        आता शांत स्वभावाच्या लोकांसमोर काय होत आहे हे सर्व माहिती असताना देखील शांतच असतो कारण शांत स्वभावाचा माणूस समोर एक आणि ओठावर एक बोलतो एवढाच फरक आहे.शांत असणाऱ्या व्यक्तीला जवळ केले जाते आणि राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला दूर ठेवल जात कारण खर बोलणार्याची आणि निस्वार्थपणे काम करणार्याची एलर्जी असते आणि गोड बोलून आपले काम काढणाऱ्या लोकांना जवळ केले जाते.त्यासाठी क्षेत्र कोणतेही असो परिस्थिती कोणतीही असो तुम्ही जर डोळेझाकुन विश्वास ठेवत असाल तर तस करू नका कारण कोणावरही विश्वास ठेवताना मर्यादा पाहूनच विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

        कोणताही विचार न करता आपण जर एका क्षणात कोणालाही आपलंसं मानत असाल तर तस न करता त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर विचार मंथन करून योग्य ते पाऊल उचलले पाहिजे पहिल्याच भेटीत जर कोणताही विचार न करता आपण आपलंसं करण्याचा प्रयत्न केला तर नुकसान आपलंच आहे त्यासाठी राग आणि शांत स्वभाव समोरच्या व्यक्तीला काय प्रिय आहे ते देखील तपासून पहाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.विचार न करता आपण जर कोणावर विश्वास ठेवत असाल तर ते तिथेच थांबले पाहिजे.आज आपलास वाटणाऱ्या वाटणारी व्यक्तीला आपला अचानकच तिरस्कार वाटू लागला तर समजून जाणे तुमची गाडी थांबली आहे आणि ती पुढे जाणार नाही. त्यासाठी कोणावर विश्वास ठेवत असाल तर ठेवा पण जास्त काही झोकून देऊ नका.
तातपर्य एवढेच रागिष्ट माणूस समोरच्या व्यक्तीला फसवत नाही आणि शांत राहणारा व्यक्ती आपल्या गैरफायदा घेऊन आपल्या जीवनात विग्न आणण्यासाठी तयारी करत असतो त्यासाठी राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला दूर करू नका कारण तीच व्यक्ती स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तवर जास्त विश्वास ठेवत असू शकत असेल तर काही सांगू शकत नाही प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो त्याचा वेगळा अर्थ काढू नका आपल्या जीवनाची वाटचाल चांगल्या रीतीने करा.

        नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि याच्यापुढे कोणत्या प्रकारचा ब्लॉग हवाय हे देखील कळवा नकीच त्यावर ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न केला जाईल.

टिप्पण्या

  1. शांत आणि रागीट स्वभावामधील फरक मोजक्या शब्दात अधोरेखित केला आहे

    उत्तर द्याहटवा
  2. विश्वास ठेवताना आपण भावनिक न होता समोरच्या व्यक्तीचे गुण आणि दोष तपासले पाहिजे म्हणजे माणसाचा स्वभाव कळतो हे या लेखातून स्पष्ट होते.
    छान लेख आहे!👌👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"