आज शिक्षण व्यवस्थेवर काही बोलणार आहोत आणि नक्कीच आपल्याला हे आवडेल देखील आपल्या ब्लॉगचा विषय आहे
शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का? शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का याला मी जाणूनबुजून प्रश्न चिन्ह दिला आहे कारण मी यात काही विचार मांडणार आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे त्यावरून आपल्याला शिक्षण व्यवस्थामधील होत चालेले बाजारीकरण समजेल.
देशात राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला समजेल देशातील मूळ मुद्यावरून जनतेची दिशाभूल केली जातेय आणि त्यात आपला तरुण वर्ग भरकटत चालला आहे.देशात मूळ मुद्दा उरतो तो म्हणजे 'शिक्षण' शिक्षणावर जेवढ्या प्रमाणात भर दिला गेला पाहिजे तो दिला जात नाहीये राजकीय नेते टीका करण्यात व्यस्त आहे मात्र शिक्षणापासून सामान्य वर्ग दूर होत चालला आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.आज मितीला शिक्षण व्यवस्था संपलेली असल्याचे दिसून येत आहे.सामान्य जनतेला योग्य शिक्षण घेता येत नसल्याने आज आपल्या पाल्याला शिक्षणापासून दूर करून कामात गुंतवत आहे त्याच मूळ कारण म्हणजे 'शिक्षणाचे बाजारीकरण.'
देशात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने आज शिक्षणाला महत्व राहताना दिसत नाहीये.आज लाखो रुपये घेऊन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला जातोय आणि तो प्रवेश बड्या बापाच्या मुलांसाठी सोईस्कर झालाय मात्र सामान्य नागरिकांच्या मुलांची पिळवणूक होताना दिसत आहे.आज देशात सरकारी शाळेत ज्या सुविधा हव्यात त्या देत नसल्याने बडे बडे राजकीय पुढारी आपल्या शिक्षण संस्था काढून लाखो रुपये कमवत आहे आणि गरीब विद्यार्थी हा शिक्षणापासून दूर होतोय. शाळा, कॉलेजमध्ये लाखो रुपयांची मागणी केली जातेय आणि ती फी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना देणं शक्य होत नसल्याने आज त्यांची मूल गावंडी काम किंवा छोट्याशा कामावर रुजू होतोय आपले अर्धवट सोडून याला कारणीभूत देश चालवणारी मंडळीच आहे.
कोरोना काळात उद्योग व्यवसाय बंद होते आणि शाळा कॉलेज देखील बंद होते आणि तरीही देखील सर्व सुरळीत चालू झालेवर अमाप पैसे घेणे काही शिक्षण संस्थांनी बंद केले नाही कारण आज शिक्षण संस्था राजकीय पुढाऱ्यांची असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे दिसत आहे.दहावीपर्यंत तरी शिक्षण मोफत केले पाहिजे आज परिस्थिती भयानक झालेली पाहायला मिळत आहे.LKJ.मध्ये शिकणाऱ्या बालकाची फी 20 आणि 30 हजार आहे.हीच परिस्थिती निरंतर राहिली तर बड्या बापाच्या मुलांनी शिकायचे आणि गरीब बापाच्या मुलांनी त्यांच्या घरी घर कामाला जायचं असे होईल.
देशात होऊ चाललेल्या शिक्षण बाजारीकरनावर आळा घालण्यासाठी सरकारने सरकारी शाळा याला अधिक महत्व दिले पाहिजे आणि बड्या बापाच्या शाळा जास्तीची फी आकारत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आज शाळा,कॉलेज अमाप फी आकारत असल्याने शिक्षण व्यवस्था ही कुजत चाललीय असे म्हणायला काही हरकत नाही.सरकारी शाळांमध्ये योग्य उपाययोजना आणि चांगल्या सुविधा दिल्या तर आज गरीबतला गरीब विद्यार्थी योग्य शिक्षण घेऊ शकेल आणि आपल्या आई वडिलांना गरिबीतून बाहेर काढेल.
शिक्षण व्यवस्थेमध्ये बाजारीकरण राजकीय वरदहस्त असल्याने होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.जोपर्यंत सरकारी शाळांना सोयीसुविधा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत शिक्षणाच्या बाजारीकरनावर आळा बसणार नाही.तरी आज काही आई वडील देखील सरकारी शाळांना नाव ठेवताना दिसतात शिक्षण कस आहे काय आहे याकडे त्यांचे देखील लक्ष नाते फक्त सरकारी हा शब्द ऐकून त्यांना नकोसे वाटतय आई वडिलांनी देखील आपली मानसिकता बदलली पाहिजे आणि सरकारी शाळेच्या प्रवाहात आणले पाहिजे नागरिकांनी देखील आवाज उठवून सरकारी शाळेचा आग्रह धरला पाहिजे तेव्हाच सरकारी शाळेचे महत्व कळेल आणि खाजगी शाळांना टाळा लागेल.व शिक्षण व्यवस्थेचे बाजारीकरण थांबेल.
शिक्षण व्यवस्थेला कुजकट बनवण्यात देखील आपलाच तितकाच हात असतो तितका सरकारचा त्यासाठी एकजुटीने एक होऊन शिक्षणाच्या बाजारीकर्णावर आवाज उठवून सरकारी शाळांचा आग्रह धरला पाहिजे व कुजत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेला थांबवले पाहिजे.
असो तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला त्यावर आपली प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुढचा ब्लॉग कोणत्या विषयावर असावा हे कळवा धन्यवाद.
शिक्षण व्यवस्थे बद्दल खूप छान आपले मत मांडले आहे.परंतु शिक्षण विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचार याबाबत देखील प्रकाश टाकणे गरजेचे होते.अनुसूचित जाती मधील पालक व विद्यार्थी यांचे कायदेशीर खच्ची करण सुरू आहे, जातीच्या रकान्यात बौद्ध लिहिण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश असताना शाळा हिंदू हाच धर्म लिहिण्याचा आग्रह करतात. यावर सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत मी स्वतः जिल्हा परिषद पुणे यांचे कडे पाठ पुरावा करत आहे. यामध्ये एकसूत्रता येणे गरजेचे आहे. एक पत्रकार म्हणून स्ट्रिंग ऑपरेशन करावे, ही आपणास सूचना वजा विनंती समजावी. कळावे. आपला:-सागर उबाळे, अध्यक्ष:-ऑल इंडिया पँथर सेना.
उत्तर द्याहटवानक्कीच आपल्या या प्रतिक्रियेची दखल घेतली जाईल
उत्तर द्याहटवा