नमस्कार मित्रांनो मी प्रत्येकवेळी आपल्यासाठी नवनवीन विचार घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही देखील त्याला भरभरून प्रतिसाद देखील देत आहात आणि असेच सहकार्य निरंतर ठेवावे हीच अपेक्षा आपणाकडून आहे.आणि जे विचार आहेत ते सोप्या स्पष्ट भाषेत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे.आजचा आपला ब्लॉग आहे
'जिथे भेळ तिथेच खेळ' तर नक्कीच हा ब्लॉग देखील आपल्याला आवडेल हीच अपेक्षा करतो.
'जिथे भेळ तिथेच खेळ' हा विषय मी आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि ज्यांना काही तर्क वितर्क लावायचा आहे ते लावू शकतात आणि कमेंट्स मध्ये नमूद देखील करू शकता.आजच्या राजकीय परिस्थितीला पाहता प्रत्येक वर्ग आजच्या राजकारणाला कंटाळलेला आपल्याला दिसत आहे.राजकारण एवढे खिळखिळी झाली आहे राजकारण काहींना नकोसा वाटणारा विषय झाला आहे.राजकारणाने पूर्णपणे दूषित वातावरण केले आहे नागरिकांच्या समस्या दूर करायचे सोडले आणि टीका टिपण्णी वर जास्त जोर दिला जात आहे.
आजचा तरुण वर्ग राजकारणात उतरतोय मात्र ज्यांच्याकडे खायला भेटेल त्याचेच तुणतुणे वाजवताना दिसत आहे.देशात होत चालेल्या समाज विघातक गोष्टी बाजूला सारून आपलं एक टाईमच कसे भागेल यावर लक्ष दिले जात आहे.आज मितीला निवडणुकीत उभा राहणार अस सांगून खाण्याचे आणि दारूचे आमिष दाखवून तरुणाईला आपल्या विळख्यात घेण्याचं काम काही लोक करीत आहेत.मात्र तरुण पिढी देखील ज्याच्या इथे खायला भेटेल त्याच काम त्याची व्हा व्हाई करताना दिसत आहे.
जो जास्त पैसा देईल जो खाण्यासाठी देईल त्याला आज जास्त प्राधान्य दिले जात आहे.पाच वर्षांत किंवा सामाजिक कामात शुन्य अस्तित्व असणाऱ्याना जवळ केले जातेय.आज समाजात वावरत नागरिकांच्या समस्या जाणून घेणाऱ्याला दूर लोटल जातंय.हे अस का होतय तर आपली मानसिकता ही कोणाच्या तरी दावणीला बांधून मंद केलेली आहे.आज समाजात काम करणारया निस्वार्थ कार्यकर्त्याची कोंडी होतीये.ज्याच्या इथे खाण्यासाठी भेटेल त्याचा गुलाम होऊन त्याची प्रसिद्धी करायची ही मानसिक गुलामी आजच्या युवा पिढीत आहे.
आज कुठे निवडणूकेचे बिगुल वाजले आहे आणि कामशून्य तरुण बाहेर येत आहेत आणि दारूची बाटली घेऊन काही महाभाग देखील त्यांच खाऊन त्यांचा प्रचार करत आहेत आणि जनतेत जाऊन जनतेची कामे करणाऱ्याना लांब केलं जातंय.मटण,दारू, वर काहींना विकत घेतल जातंय अशाच काही समाजविघातक लोकांना वेळीच रोखले गेले पाहिजे.आज काही पैसे खाऊ लोकांमुळे प्रत्येक विभागात नागरिकांना कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांची एकजुटता ही आवश्यक असणे गरजेचे आहे.ज्याचे खायचे त्याचे उदो उदो करायचे अशी परिस्थिती सध्याला निर्माण झाली आहे.
पक्षाकडून तिकीट घेणे आणि निवडणूक लढवणे निवडून आले की नेत्यांच्या म्हणण्यानुसार ऐकायचे आणि गेली पाच वर्षे नागरिकांनी जी यातना भोगली ती पुन्हा भोगण्यासाठी तयार होयचे.सध्याची तरुणाई अगोदरच्या नगरसेवकांना नावे ठेवताना दिसत आहे आणि पुन्हा त्याच पक्षाकडे जाऊन तिकीट मागायचे लोकांना फक्त वेड्यात काढायचे काम सुरू केले आहे.दारू,मटण लोकांना चारायचे आणि त्यांच्या मार्फत लोकांची दिशाभूल करायची अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.त्यासाठी नागरिकांनी 'जिथे भेळ तिथेच खेळ' करणार्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.व स्वाभिमानाने योग्य उमेदवार निवडून देऊन आपल्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे.
'जिथे भेळ तिथेच खेळ' करणाऱ्याची एकच चाल असते ती म्हणजे पैसे देऊन लोक विकत घेणे आणि त्यांच्यामार्फत प्रचार प्रसार करणे आणि खोट्या जाहिराती करून निवडून येण्याचा प्रयत्न करणे.त्यासाठी नागरिकांनी देखील विचारपूर्वक उमेदवार निवडला पाहिजे. ज्या युवकांनी निस्वार्थपणे नागरिकांची कामे केली आहेत त्यांनाच एक संधी दिली पाहिजे.वर्षानुवर्षे वर्षे म्हाताऱ्यांनी जनतेला लुटले आहे त्यांना आता थांबवले पाहिजे आता त्याच म्हाताऱ्यांनी आपली मुले राजकीय पटलावर उतरवली असल्याचे देखील दिसत आहे.त्यासाठी नागरिकांनी जागृत होऊन 'जिथे भेळ तिथेच खेळ' करणाऱ्यांचा खेळ जागेवर थांबवला पाहिजे.
नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल आवडला नसेल तरी आपण एकदा आपली प्रतिक्रिया देऊन आपले मत मांडावे.'जिथे खेळ तिथेच भेळ' हे गावठी शीर्षक तुमच्यासाठी आणि तुम्हाला समजेल यासाठी घेतले आहे.सोप्या आणि स्पष्ट भाषेत नागरिकांना जे पाहिजे ते दिले तर नक्कीच प्रतिसाद भेटतो आणि तुम्हाला देखील आवडले असेल तर मला कमेंट करून कळवा.
बरोबर च आहे
उत्तर द्याहटवाअतिशय परखड सत्यता मांडली आहे.पण जनतेला कळतंय पण वळत नाही.ही वस्तुस्थिती आहे.
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद आपल्या प्रतिक्रियेणे मनोबल वाढतंय असेच मार्गदर्शन रहावे
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर 👌👍
उत्तर द्याहटवा