"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

प्रेमाची परिभाषा काळजीची अशा?

      नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन विषय घेउन आलोय तो म्हणजे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा! किती आणि कोणाची कशी काळजी घ्यायची यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करणार आहोत.आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा! 
प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
        मित्रांनो नकळत आपण आपल्याला जवळच्या व्यक्तीला अपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून आपण अतोनात तिच्यासाठी कष्ट घेत असतो अर्थात तू काय करते,तू कुठे आहेस,काय करतेस,या शब्दांचा मारा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण वेळोवेळी वापरत असतो.मात्र त्यांना त्याची कदर नसते उलट आपल्या काळजिवाहू मनावर संशयाची शाळा उभारली जाते आणि आपल्या काळजी मनावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात आणि बोलायला लागतात तुझा माझ्यावर विश्वास नाही का?,तू अस का बोलतो, काळजी आपण घेतो पण समोरची व्यक्ती त्याचा उलट अर्थ काढते आणि अपल्यापासून दूर जाते.

        सध्याची परिस्थिती कोणी कोणाची काळजी करत नसतो काळजी तीच व्यक्ती करते त्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रेम असते किंवा विश्वास मात्र जो काळजी करतो त्यालाच दोष दिला जातो आणि त्याला खोट ठरवलं जात.आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घेतो कारण आपल्या जीवपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा करतो असतो मात्र जीव लावणाऱ्या व्यक्तीलाच दूर केले जाते आणि आयुष्य बरबाद करणाऱयांच्या बाजूने लोक जातात.

        आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जीवाची पर्वा करतो पण त्याला त्याची जाणीव नसेल तर त्याला त्याच्या परिस्थितीवर सोडलेले कधीही बरे कारण आयुष्यात अनेक समस्या येत जातात दुःख सर्वांच्या वाट्याला आहे पण त्या वाट्यातून आपण कसे बाहेर जायचे हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यासाठी स्वतःला दुःख करून घेण्यात काही अर्थ नाही दुःखातून आपण कसे मुक्त होऊ याला जास्त महत्व आहे.समोरच्या व्यक्तीला आपली कदर नसेल तर समजून जा आता आपली गरज संपली आहे.

        जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत बोलत असतो तेव्हा आपले आनंदमयी जीवन चालू असते मात्र कोणतेही कारण नसताना आपली जवळची व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागली तर समजून जा आपली आता समोरच्या व्यक्तीला गरज नाही.कोणतेही संकट आले आणि कितीही परिस्थिती गंभीर असेल तर खरय प्रेमाला कोणीच दुर्लक्ष करू शकत नाही.आपल्यावरचा विश्वास, प्रेम. कमी झाले की समजून जा समोरच्या व्यक्तीची काळजी करतो म्हणजे मूर्खपणा तर नव्हे.

        प्रेम विश्वास करणारी व्यक्तीची अचानक वागणुकीत बदल होतो म्हणजे तुमच्यावरचा विश्वास कमी झाला हे मात्र खरं आणि तुमची तिच्या किंवा त्याच्या जीवनात एक अडथळा आहे.दुर्लक्ष करते याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्यापासून सुटका हवी आहे.काही व्यक्ती तुम्हाला लगेच सांगणार नाही तू माझ्याशी बोलू नकोस,तू मेसेज करू नकोस,तुमच्या बोलण्याकडे तुमच्या प्रत्येक प्रेमाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला उलट उत्तर देणे म्हणजेच तुमच्यापासुन सुटका.त्यासाठी कोणाचीही किती काळजी करा पण प्रमानाच्या बाहेर जाऊन नको कारण आपल्याला दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तीला काळजी या वाक्याचा अर्थ समजलेला नाही आणि समजलेला असून देखील त्याच पद्धतीची वागणूक देत असेल तर समजून जा तुम्हाला ते खेळवत आहे आणि तुम्हाला मूर्ख समजत आहे.

       त्यासाठी काळजी करा मात्र त्याच्या आहारी जाऊन आपली स्वतःची किंमत कमी करून घेऊन स्वतःचे हसू करू नका कारण या आयुष्यात आपली मजा पाहणारे खूप असतात दुःखात हसणारे खूप असतात पण सुखात कमी असतात.त्यामुळे काळजी करायची असेल तर जाणीव असणाऱ्या व्यक्तीची करा तुमचा वापर करून तुमची जीरो किंमत करणारी व्यक्तीची करू नका.काळजी करून देखील तुमची कवडीची किंमत नसेल तर त्या नात्याला काही अर्थ नाही.आपण आपलं आयुष्य समोरच्या व्यक्तीच्या स्वाधीन करून देखील आपली कदर नसेल तर त्याला काही अर्थ नाही त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याशी तिची किंवा त्याची वागणूक तशी आपण देखील दिली पाहिजे.सोप्या भाषेत म्हटले तर जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे.

        मनापासून प्रेम किंवा काळजी करणारी व्यक्ती कधीच उपकाराची भाषा बोलत नाही उपकाराची भाषा तीच व्यक्ती बोलते जिच्या आयुष्यात आपली काही गरज नाही.आणि आपल्यापासून त्या व्यक्तीला सुटका हवी आहे.त्यासाठी प्रेमाची भीक मागू नका ज्याला त्याची कदर नाही त्याच्या जास्त आहारी जाऊ नका आणि आपल्या आयुष्याची सुरुवात नव्याने करा.आपल्या आयुष्यात अशी काही घटना घडलीच नाही ते एक स्वप्न होते असे समजून जीवनाचा गाढा पुढे घेऊन जा.तातपर्य एवढेच ज्यांना आपल्या प्रेमाची किंमत नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊद्या त्यांच्या आयुष्यात अडचण म्हणून आपण जाण्याचा कदापि प्रयत्न नाही केला पाहिजे.

        नक्कीच मित्रांनो हा ब्लॉग देखील आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करूया सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला हा ब्लॉग उपलब्ध करून दिला आहे नक्कीच आपण हा ब्लॉग वाचून प्रतिक्रिया द्याल ही अपेक्षा करतो आणि पुढे कोणता ब्लॉग असावा हे देखील कळवा हीच विनंती.

ब्लॉगर -पवन गौतम साळवे(दौंड)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"