"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

झेंडा हाय पण घर नाय

झेंडा हाय पण घर नाय

        देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र,देशात अनेक ठिकाणी काहींना घर नाहीये राहण्यासाठी ज्यांना घर नाही त्यांनी झेंडा लावायचा कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय देशात वाढत चालेली महागाई वाईट राजकारण याच काय?

         आदिवासी भागात आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार आणि निवारा या प्राथमिक सुविधां अभावी वंचित आहेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना 'हर घर तिरंगा' अशी हाक देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनही काही घरे रेल्वेच्या जागेत आहेत त्यांना त्या ठिकानावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर कोण प्रकाश टाकणार यांच्याकडे लक्ष देणार आहे की नाही.
         रेल्वेच्या जागेत कित्येक वर्षांपासून कुटुंब वास्तव्य करत आहेत त्यांना त्या जागेवरून बेघर करण्याचे देखील हालचाली सुरू झालेत काहींना नोटिसा देखील आलेत अश्या परिस्थितीत यांना बेघर करून आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत का? देशातील सर्वांमध्ये देशभक्ती आहे झेंडा पण आहे घर नाही ते फक्त आम्हाला द्या असा सुरू निघतोय.

         देशात हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या आदेशाने साजरा केला जातोय आणि रेल्वे विभाग देखील केंद्राच्या आदीपथ्यखाली येत आहे.एवढे सर्व होत असताना देखील त्यांना घरे का नाही.देशातील काही नाही तर अनेक घरे रेल्वेच्या जागेत आहेत त्यांना अगोदर त्यांची हक्काची घरे देणे गरजेचे असताना हर घर तिरंगा का? गाडगेबाबा म्हणतात भुकेल्याना अन्न द्या उगड्या नागड्यांना वस्त्र द्या घरे द्या एवढे महापुरुष महान वाणी देऊन गेले तरी त्यांच्या विचारधारेकडे दुर्लक्ष का?

        अजून देखील कित्येक कुटुंब स्वतःच्या घरापासून वंचित आहेत आणि ते रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झोपडी टाकून राहत आहेत.हे कुटुंब स्वतःच्या हक्काच्या घरात केव्हा येणार?देशातील वर्षानुवर्षे  कुटुंब रेल्वेच्या जागेत राहत आहेत त्यांना त्यांच्या हक्काची घरे दिले पाहिजे तेव्हाच तर बोलू शकतो हर घर तिरंगा. तेव्हाच तर या घोष वाक्याचे सार्थक आहे.निवेदने देऊन देखील त्यांच्या निवेदनाची दखल घेतली जात नाहीये.जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची स्वतःची घरे मिळायला हवी.

        तसेच आज कातकरी म्हणजेच ऊस तोडी करणारे कुटुंब देखील ते आज झोपडी टाकून आपली कामे करतायेत त्यांची देखील अवस्था बिकट आहे त्यांच्याकडे देखील लक्ष दिलेच पाहिजे.देशातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काची घरे मिळणे गरजेचे आहे आणि ते मिळालेच पाहिजे.अमृत महोत्सव साजरा करायचा असेल तर प्रत्येकाला हक्काची घरे देऊन खरी देशभक्ती दाखवली पाहिजे.

         त्यामुळे आज स्वतःच्या घरापासून वंचित असणार कुटुंब अजून देखील बोलत आहे झेंडा हाय पण घर नाय आता या हाकेला देशात किती गांभीर्याने घेणार हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार आहे.भाषण करून देशभक्ती साध्य होत नाही तर ती त्यांच्या गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करते तेव्हाच ते देशभक्ती साध्य होतीये.

        मित्रांनो मी आज या माझ्या Blog च्या माध्यमातून खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोटासाठी वणवण

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"