पोस्ट्स

"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"

इमेज
        सध्या महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला उधाण आलेल पाहिला मिळत आहे.आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शो ला विरोध काहींचा असा समज आहे की नृत्यांगना गौतमी पाटील हिने लावणीचा या लोककलेचा अवमान करीत आहे व नृत्य करताना अश्लील कृत्य करीत आहे त्यासाठी गौतमी पाटीलला विरोध होत आहे.         अवघ्या तरुणाईला आपल्या नृत्याने वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिने आज मात्र टीकाकार यांच्या विरोधाला पूर्णविराम लावले आहे.साम TV ने घेतलेल्या मुलखातीत तिने स्पष्ट आणि बिनदास्त मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत तिने पूर्णपणे स्पष्ट केले आहे की मी कुठे चुकत नाही आणि मी घाबरू कशाला कोणाला मी नृत्य करते ते वेस्टर्न नृत्य आहे.फक्त ज्यांनी टीका केली त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला आहे हा त्यांचा दृष्टिकोन आहे मी त्याला काही करू शकत नाही असे यावेळी मुलाखतीत म्हटले आहे.         मी जे नृत्य करत आहे ते वेस्टर्न नृत्य आहे लावणीचा आणि माझा काहीही संबंध नाही असे यावेळी निर्भीडपणे आपली मते व्यक्ती केली.लावणीचा कार्यक्रम हा पूर्णपणे लावणी केला जातो मात्र मी जे नृत्य करते ते DJ वर करते

"रंगात गुरफटलो आम्ही"

इमेज
        आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलोय आजचा ब्लॉग म्हणजे एका विषयाकडे हात घालणारा ब्लॉग आहे पण या ब्लॉगने काहींना मिर्ची लागणार तर काहींना हा ब्लॉग आवडणार पण मित्रांनो आवडो किंवा न आवडो दोन्ही विचार सरणीच्या लोकांनी या ब्लॉगचा अर्थ नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.आपण आजचा ब्लॉग हा देशात कोण्ही कोणता रंग वापरायचा यावर होत असलेल्या राजकारणावर आहे.        आज देशात काही संकोचीत बुद्धीच्या लोकांची संख्या जास्तच वाढत असताना आपल्याला मिळत आहे.आणि त्या संकोचीत बुद्धीच्या लोकांनी देशात जाती धर्मावरून राजकारण सुरू केले आहे आणि ते म्हणजे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी (whatsapp university)  मधून शिक्षण घेऊन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे.अर्थात फॉरवर्ड (Forward) मेसेज पसरवून हुशारी दाखवण्याचे काम सध्या होताना दिसत आहे.         देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना लोकशाही प्रधान मानणाऱ्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत तर नाहीना असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे देखील आजच्या परिस्थितीतुन दिसून येत आहे.

झेंडा हाय पण घर नाय

इमेज
झेंडा हाय पण घर नाय         देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र,देशात अनेक ठिकाणी काहींना घर नाहीये राहण्यासाठी ज्यांना घर नाही त्यांनी झेंडा लावायचा कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय देशात वाढत चालेली महागाई वाईट राजकारण याच काय?          आदिवासी भागात आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार आणि निवारा या प्राथमिक सुविधां अभावी वंचित आहेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना 'हर घर तिरंगा' अशी हाक देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनही काही घरे रेल्वेच्या जागेत आहेत त्यांना त्या ठिकानावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर कोण प्रकाश टाकणार यांच्याकडे लक्ष देणार आहे की नाही.          रेल्वेच्या जागेत कित्येक वर्षांपासून कुटुंब वास्तव्य करत आहेत त्यांना त्या जागेवरून बेघर करण्याचे देखील हालचाली सुरू झालेत काहींना नोटिसा देखील आलेत अश्या परिस्थितीत यांना बेघर करून आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत का? देशातील सर्वांमध्ये देशभक्ती

पोटासाठी वणवण

इमेज
        नमस्कार मित्रांनो आपण आज पुन्हा एका नवीन विषयाकडे वळणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला माझा नवीन ब्लॉग आवडेल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या ब्लॉगला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.         मी आहे पवन साळवे आणि आपल्यासाठी जीवनात होणाऱ्या नवनवीन विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही देखील चांगले प्रेम देत आहात.हा चला तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू पोटासाठी वणवण हा आपला विषय आहे.जीवनात जीवन जगत असता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काहींना काही तरी काम तर करावेच लागतात पण माझ्या नजरेत एक दृश्य आहे ते मी आपल्या समोर मांडणार आहे.         फोटोमध्ये तुम्ही पहा एक पोतराज आहे आणि त्याची बायको आणि मूल हे आपला उदरनिर्वाह चालवत आहे दक्षिणा मागत आहेत तर खाण्याची वस्तू आपल्या मुलाबाळांच्या पोटासाठी एक वेळेची भाकर तर देणे त्यांचे आद्यकर्तव्य आहेच मात्र कित्येक वर्षे हे अस चालत येत आहे यांच्यात परिवर्तन म्हणजे काय हे अजून देखील समजले नसल्याने ही परिस्थिती वर्षानुवर्षे चालूच राहिली आहे.मी देखील लहानपणापासून तेच दृश्य पाहत आलोय ते म्हणजे पोतराज आहे दक्षिणा मागत आहे अंगावर चाबूक मारत आह

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

इमेज
        नमस्कार मित्रांनो Blog मराठीत कमी हिंदी आणि अन्य भाषेत खूप पहायला आणि ऐकायला मिळत आहे आता मी तुमच्यासाठी मराठीत देण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि तुम्हाला एक विनंती देखील आहे की हा व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या.         आज मी तुमच्यासाठी नवीनच विषय घेऊन आलोय तो म्हणजे २५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा मित्रांनो आज मितीला मुलीचे वय १८ च्या पुढे गेले की तिच्या लग्नाची तयारी सुरू होते आणि मुलीच्या आईच्या अपेक्षा देखील खूपच असतेच सहाजिकच असणारच कारण आपल्या मुलीचा जोडीदार हा चांगल्या हुद्यावर असावा,स्वतःचे घर असावे,आणि निर्व्यसनी असावा अश्या अनेक अपेक्षा मुलांकडून पहिल्या जातात.आपल्या मुलीचे भविष्य चांगले असावे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि ती असायलाच पाहिजे.         पण २५ वर्षाच्या मुलांकडून एवढ्या अपेक्षा करणे कितपत योग्य आहे हे देखील तपासूनच पाहिले पाहिजे.मित्रांनो मुलाच्या आई वडिलांची प्रॉपर्टी आणि मुलाची स्वतःची वयक्तिक प्रॉपर्टी यात जमीन असमानचा फरक तर आहेच.काही लोक आई वडिलांची प्रॉपर्टी पाहून मुलगी देतात तर काही त्याच

प्रेमाची परिभाषा काळजीची अशा?

इमेज
      नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन विषय घेउन आलोय तो म्हणजे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा! किती आणि कोणाची कशी काळजी घ्यायची यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करणार आहोत.आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा!  प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.         मित्रांनो नकळत आपण आपल्याला जवळच्या व्यक्तीला अपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून आपण अतोनात तिच्यासाठी कष्ट घेत असतो अर्थात तू काय करते,तू कुठे आहेस,काय करतेस, या शब्दांचा मारा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण वेळोवेळी वापरत असतो.मात्र त्यांना त्याची कदर नसते उलट आपल्या काळजिवाहू मनावर संशयाची शाळा उभारली जाते आणि आपल्या काळजी मनावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात आणि बोलायला लागतात तुझा माझ्यावर विश्वास नाही का?,तू अस का बोलतो, काळजी आपण घेतो पण समोरची व्यक्ती त्याचा उलट अर्थ काढते आणि अपल्यापासून दूर जाते.         सध्याची परिस्थिती कोणी कोणाची काळजी करत नसतो काळजी तीच व्यक्ती करते त्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रेम असते किंवा विश्वास मा