पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"चायनीज मांजा मानवजातीचा कर्दनकाळ"

इमेज
        पतंग हा सर्व लहान थोरांचा जिव्हाळ्याचा विषय परंतु हाच कोणाच्या तरी जीवावर बेतू नये याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे,पतंग उडवत असताना मुल जो नयलोंनचा धागा वापरत आहेत तो अक्षरशः जीवघेणा ठरतो आहे.आपली धोडिशी मजा कोणा साठी जीवघेणी ठरताना दिसत आहे.          मुंबई पुणे मुंबई सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या शहरात मंज्यामुळे मृत्यू मुखी पडलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . माणस तर माणस पण हजारो पक्षी या मांज्या मुळे आपला प्राण गमावून बसले आहेत त्यांचा हकनाक बळी जात आहे.          सध्याची परिस्थिती पाहता शासकीय पातळीवर अनेक कायदे केले ही जातील , या मांज्या ज्या दुर्दैवी घटना घडत आहेत त्या बद्दल संवेदना जागृत होणे आवश्यक आहे. कोणचा मुलगा ,कोणाचे वडील ,कोणाची आई,कोणाची बहीण जेंव्हा या त्यांना अचानक सोडून जातात त्यावेळी काय दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर पडला आहे,याची जाणीव  सर्वांनी ठेवावी.अनेक पालक खूप निष्काळजी पणाने आपल्या चिमुरड्या मुलांच्या हातात नायलॉन चा धागा देतात .          तर ही गोष्ट कटाक्षाने टाळले पाहिजे.आपली छोटीशी हौस मौज क

"मला लावणी येत नाही;मी लावणी शिकतेय"

इमेज
        सध्या महाराष्ट्रात वेगळ्याच चर्चेला उधाण आलेल पाहिला मिळत आहे.आणि ती म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलच्या शो ला विरोध काहींचा असा समज आहे की नृत्यांगना गौतमी पाटील हिने लावणीचा या लोककलेचा अवमान करीत आहे व नृत्य करताना अश्लील कृत्य करीत आहे त्यासाठी गौतमी पाटीलला विरोध होत आहे.         अवघ्या तरुणाईला आपल्या नृत्याने वेड लावणारी सोशल मीडिया स्टार नृत्यांगणा गौतमी पाटील हिने आज मात्र टीकाकार यांच्या विरोधाला पूर्णविराम लावले आहे.साम TV ने घेतलेल्या मुलखातीत तिने स्पष्ट आणि बिनदास्त मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत तिने पूर्णपणे स्पष्ट केले आहे की मी कुठे चुकत नाही आणि मी घाबरू कशाला कोणाला मी नृत्य करते ते वेस्टर्न नृत्य आहे.फक्त ज्यांनी टीका केली त्यांनी त्याचा वेगळा अर्थ काढला आहे हा त्यांचा दृष्टिकोन आहे मी त्याला काही करू शकत नाही असे यावेळी मुलाखतीत म्हटले आहे.         मी जे नृत्य करत आहे ते वेस्टर्न नृत्य आहे लावणीचा आणि माझा काहीही संबंध नाही असे यावेळी निर्भीडपणे आपली मते व्यक्ती केली.लावणीचा कार्यक्रम हा पूर्णपणे लावणी केला जातो मात्र मी जे नृत्य करते ते DJ वर करते

"रंगात गुरफटलो आम्ही"

इमेज
        आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलोय आजचा ब्लॉग म्हणजे एका विषयाकडे हात घालणारा ब्लॉग आहे पण या ब्लॉगने काहींना मिर्ची लागणार तर काहींना हा ब्लॉग आवडणार पण मित्रांनो आवडो किंवा न आवडो दोन्ही विचार सरणीच्या लोकांनी या ब्लॉगचा अर्थ नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे.आपण आजचा ब्लॉग हा देशात कोण्ही कोणता रंग वापरायचा यावर होत असलेल्या राजकारणावर आहे.        आज देशात काही संकोचीत बुद्धीच्या लोकांची संख्या जास्तच वाढत असताना आपल्याला मिळत आहे.आणि त्या संकोचीत बुद्धीच्या लोकांनी देशात जाती धर्मावरून राजकारण सुरू केले आहे आणि ते म्हणजे व्हाट्सएप युनिव्हर्सिटी (whatsapp university)  मधून शिक्षण घेऊन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहे.अर्थात फॉरवर्ड (Forward) मेसेज पसरवून हुशारी दाखवण्याचे काम सध्या होताना दिसत आहे.         देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना लोकशाही प्रधान मानणाऱ्या देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत तर नाहीना असा प्रश्न अनेकांना पडायला लागला आहे.देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय असे देखील आजच्या परिस्थितीतुन दिसून येत आहे.

झेंडा हाय पण घर नाय

इमेज
झेंडा हाय पण घर नाय         देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र,देशात अनेक ठिकाणी काहींना घर नाहीये राहण्यासाठी ज्यांना घर नाही त्यांनी झेंडा लावायचा कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय देशात वाढत चालेली महागाई वाईट राजकारण याच काय?          आदिवासी भागात आजही रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, रोजगार आणि निवारा या प्राथमिक सुविधां अभावी वंचित आहेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना 'हर घर तिरंगा' अशी हाक देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. मात्र अजूनही काही घरे रेल्वेच्या जागेत आहेत त्यांना त्या ठिकानावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे यावर कोण प्रकाश टाकणार यांच्याकडे लक्ष देणार आहे की नाही.          रेल्वेच्या जागेत कित्येक वर्षांपासून कुटुंब वास्तव्य करत आहेत त्यांना त्या जागेवरून बेघर करण्याचे देखील हालचाली सुरू झालेत काहींना नोटिसा देखील आलेत अश्या परिस्थितीत यांना बेघर करून आपण अमृत महोत्सव साजरा करणार आहोत का? देशातील सर्वांमध्ये देशभक्ती

पोटासाठी वणवण

इमेज
        नमस्कार मित्रांनो आपण आज पुन्हा एका नवीन विषयाकडे वळणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला माझा नवीन ब्लॉग आवडेल अशी अपेक्षा करतो आणि माझ्या ब्लॉगला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो.         मी आहे पवन साळवे आणि आपल्यासाठी जीवनात होणाऱ्या नवनवीन विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही देखील चांगले प्रेम देत आहात.हा चला तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळू पोटासाठी वणवण हा आपला विषय आहे.जीवनात जीवन जगत असता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काहींना काही तरी काम तर करावेच लागतात पण माझ्या नजरेत एक दृश्य आहे ते मी आपल्या समोर मांडणार आहे.         फोटोमध्ये तुम्ही पहा एक पोतराज आहे आणि त्याची बायको आणि मूल हे आपला उदरनिर्वाह चालवत आहे दक्षिणा मागत आहेत तर खाण्याची वस्तू आपल्या मुलाबाळांच्या पोटासाठी एक वेळेची भाकर तर देणे त्यांचे आद्यकर्तव्य आहेच मात्र कित्येक वर्षे हे अस चालत येत आहे यांच्यात परिवर्तन म्हणजे काय हे अजून देखील समजले नसल्याने ही परिस्थिती वर्षानुवर्षे चालूच राहिली आहे.मी देखील लहानपणापासून तेच दृश्य पाहत आलोय ते म्हणजे पोतराज आहे दक्षिणा मागत आहे अंगावर चाबूक मारत आह

२५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा?

इमेज
        नमस्कार मित्रांनो Blog मराठीत कमी हिंदी आणि अन्य भाषेत खूप पहायला आणि ऐकायला मिळत आहे आता मी तुमच्यासाठी मराठीत देण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि तुम्हाला एक विनंती देखील आहे की हा व्हिडीओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं भरभरून प्रेम द्या.         आज मी तुमच्यासाठी नवीनच विषय घेऊन आलोय तो म्हणजे २५ वर्षाच्या मुलांकडून एवढी अपेक्षा मित्रांनो आज मितीला मुलीचे वय १८ च्या पुढे गेले की तिच्या लग्नाची तयारी सुरू होते आणि मुलीच्या आईच्या अपेक्षा देखील खूपच असतेच सहाजिकच असणारच कारण आपल्या मुलीचा जोडीदार हा चांगल्या हुद्यावर असावा,स्वतःचे घर असावे,आणि निर्व्यसनी असावा अश्या अनेक अपेक्षा मुलांकडून पहिल्या जातात.आपल्या मुलीचे भविष्य चांगले असावे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि ती असायलाच पाहिजे.         पण २५ वर्षाच्या मुलांकडून एवढ्या अपेक्षा करणे कितपत योग्य आहे हे देखील तपासूनच पाहिले पाहिजे.मित्रांनो मुलाच्या आई वडिलांची प्रॉपर्टी आणि मुलाची स्वतःची वयक्तिक प्रॉपर्टी यात जमीन असमानचा फरक तर आहेच.काही लोक आई वडिलांची प्रॉपर्टी पाहून मुलगी देतात तर काही त्याच

प्रेमाची परिभाषा काळजीची अशा?

इमेज
      नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन विषय घेउन आलोय तो म्हणजे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा! किती आणि कोणाची कशी काळजी घ्यायची यामध्ये नमूद करण्याचा प्रयत्न करणार आहोत.आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे प्रेमाची परिभाषा काळजीची अशा!  प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.         मित्रांनो नकळत आपण आपल्याला जवळच्या व्यक्तीला अपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून आपण अतोनात तिच्यासाठी कष्ट घेत असतो अर्थात तू काय करते,तू कुठे आहेस,काय करतेस, या शब्दांचा मारा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी आपण वेळोवेळी वापरत असतो.मात्र त्यांना त्याची कदर नसते उलट आपल्या काळजिवाहू मनावर संशयाची शाळा उभारली जाते आणि आपल्या काळजी मनावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात आणि बोलायला लागतात तुझा माझ्यावर विश्वास नाही का?,तू अस का बोलतो, काळजी आपण घेतो पण समोरची व्यक्ती त्याचा उलट अर्थ काढते आणि अपल्यापासून दूर जाते.         सध्याची परिस्थिती कोणी कोणाची काळजी करत नसतो काळजी तीच व्यक्ती करते त्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रेम असते किंवा विश्वास मा

जिथे भेळ तिथेच खेळ

इमेज
        नमस्कार मित्रांनो मी प्रत्येकवेळी आपल्यासाठी नवनवीन विचार घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही देखील त्याला भरभरून प्रतिसाद देखील देत आहात आणि असेच सहकार्य निरंतर ठेवावे हीच अपेक्षा आपणाकडून आहे.आणि जे विचार आहेत ते सोप्या स्पष्ट भाषेत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे.आजचा आपला ब्लॉग आहे 'जिथे भेळ तिथेच खेळ' तर नक्कीच हा ब्लॉग देखील आपल्याला आवडेल हीच अपेक्षा करतो.         ' जिथे भेळ तिथेच खेळ' हा विषय मी आपणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.आणि ज्यांना काही तर्क वितर्क लावायचा आहे ते लावू शकतात आणि कमेंट्स मध्ये नमूद देखील करू शकता.आजच्या राजकीय परिस्थितीला पाहता प्रत्येक वर्ग आजच्या राजकारणाला कंटाळलेला आपल्याला दिसत आहे.राजकारण एवढे खिळखिळी झाली आहे राजकारण काहींना नकोसा वाटणारा विषय झाला आहे.राजकारणाने पूर्णपणे दूषित वातावरण केले आहे नागरिकांच्या समस्या दूर करायचे सोडले आणि टीका टिपण्णी वर जास्त जोर दिला जात आहे.         आजचा तरुण वर्ग राजकारणात उतरतोय मात्र ज्यांच्याकडे खायला भेटेल त्याचेच तुणतुणे वाजवताना दिसत आहे.देशात होत चालेल्या सम

शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का?

इमेज
         आज शिक्षण व्यवस्थेवर काही बोलणार आहोत आणि नक्कीच आपल्याला हे आवडेल देखील आपल्या ब्लॉगचा विषय आहे शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का? शिक्षण व्यवस्था कुजत चाललीय का याला मी जाणूनबुजून प्रश्न चिन्ह दिला आहे कारण मी यात काही विचार मांडणार आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये रिप्लाय द्यायचा आहे त्यावरून आपल्याला शिक्षण व्यवस्थामधील होत चालेले बाजारीकरण समजेल.        देशात राजकीय परिस्थिती पाहता आपल्याला समजेल देशातील मूळ मुद्यावरून जनतेची दिशाभूल केली जातेय आणि त्यात आपला तरुण वर्ग भरकटत चालला आहे.देशात मूळ मुद्दा उरतो तो म्हणजे 'शिक्षण' शिक्षणावर जेवढ्या प्रमाणात भर दिला गेला पाहिजे तो दिला जात नाहीये राजकीय नेते टीका करण्यात व्यस्त आहे मात्र शिक्षणापासून सामान्य वर्ग दूर होत चालला आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.आज मितीला शिक्षण व्यवस्था संपलेली असल्याचे दिसून येत आहे.सामान्य जनतेला योग्य शिक्षण घेता येत नसल्याने आज आपल्या पाल्याला शिक्षणापासून दूर करून कामात गुंतवत आहे त्याच मूळ कारण म्हणजे 'शिक्षणाचे बाजारीकरण.'        देशात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने आज

विश्वास ठेवत असाल तर ठेवा पण पूर्ण झोकू नका

इमेज
         नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज ब्लॉक लिहिण्यासाठी वेळ भेटला आणि आज आपण महत्वपूर्ण विषयाकडे वळणार आहोत त्यासाठी ब्लॉग लिहीत असताना वाचकांना काय हवंय हे देखील पाहिले पाहिजे आणि सध्या मितीला रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडीवर जाऊनच मी हा ब्लॉग लिहितोय आणि नक्कीच तो आपल्याला देखील हीच अपेक्षा करूया.          प्रत्येकजण जीवनात अनेक समस्येशी झगडत असतो आणि त्यातून देखील तो मार्ग काढत असतो मात्र काही प्रसंग असे देखील येतात त्या प्रसंगाना सामोरे जाण्यासाठी त्याची इच्छा शक्ती नसते आणि ती ईच्छा शक्ती निर्माण करण्यासाठी त्याला कोणाचा ना कोणाचा आधार तर घ्यावाच लागतो त्यासाठी अडचणींना सामोरे जात असताना त्या अडचणींवर मात करणे देखील त्याच्यासाठी ही एक महत्वाची परीक्षा असते आणि त्यात काही लोक पास देखील होतात आणि काही लोक त्यात अपयशी देखील ठरू शकतात (मी ठरू शकतात म्हणलोय)लक्षपूर्वक वाचण्यावर भर द्या विनंती.         जीवनात काही व्यक्ती रागिष्ट स्वभावाचे असतात तर काही शांत स्वभावाचे असतात आपण रागिष्ट आणि शांत स्वभाव यातला अंतर पाहणार आहोत रागिष्ट काय करतात आणि शांत स्वभावाचे काय कर

युवा पिढी दंगलीच्या खाईत.

इमेज
        नमस्कार मित्रांनो आपण आज नवीन विषयावर प्रकाश टाकणार  आहोत देशात जिथे तिथे जातीचे आणि धर्माचे राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याला मुख्यतो जबाबदर कोणाला मानायचं हे अजून देखील कोणाला समजले नाही. जो तो उठतोय आणि बोलतोय माझ्या धर्मावर संकट आले आहे म्हणून आम्ही काही गोष्टींना विरोध करीत आहोत.मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये कोणत्या धर्माचा अथवा समाजाचा उल्लेख करणार नाही मी जो हा ब्लॉग लिहीत आहे तो वाचत गेल्यावर पुढे समजेल मला या ब्लॉगच्या माध्यमातून देशातील तरुणांना काय मेसेज द्यायचा आहे तो.चला तर आपण आपल्या मूळ मुद्याला हात घालूया.         मित्रांनो देशात आर्थिक मंदीच्या दिशेने देश वाटचाल करताना दिसत आहे पेट्रोलच्या किमती खाद्यपदार्थ यांच्या किमती गगनाला भिडले असले तरी देशातील राजकीय नेते मंडळी आपल्या स्वार्थापायी यावर पडदा टाकताना आपण पाहत आहोत महागाई का वाढत आहे यावर मात्र कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.महागाई वाढत आहे मात्र प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांना युवकांना त्यांच्या पूर्वीच्या पगारावरच अवलंबून राहत आहे त्याकडे मात्र कोणी लक्ष देण्य

पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे.

इमेज
        आज आपण एक आगळ्यावेगळ्या विषयाकडे लक्ष देण्याची छोटासा प्रयत्न करणार आहोत.पुनर्विवाहला पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का  यावर आपण प्रकाश टाकणार आहोत.महिलांनी पुनर्विवाह केला पाहिजे का नाही यावर आपण थोडा विश्लेषनात्मक मुद्देसूद चर्चा करणार आहोत.चला तर पाहूया पुनर्विवाहला प्राधान्य दिले पाहिजे का.महिलांवर पुरुषांकडून होणारा अत्याचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी व उपाय.अडचणी निर्माण का होतात आणि त्या झाल्यावर त्यावर उपाय काय करावे लागतील हे देखील पाहण्याची गरज आहे.         विवाह झाल्यानंतर पती पत्नी मध्ये वाद हा होतच असतो वाद हा कशामुळे होतो हे देखील पाहणे काळाची गरज छोटा वाद हा किती विकोपाला जाऊ शकतो हे सर्वांना ज्ञात आहे.एकमेकांची मन जुळणे हे मुलीचे किंवा मुलाचे लग्न त्यांच्या इच्छा नसताना देखील करणे किंवा दोघांचे लग्ना अगोदर कोणाशी प्रेम सबंध असणे हे देखील कारणे असू शकतात.अगोदर लग्नाआगोदर घडलेल्या घटना विसरून जीवनाची वाटचाल करणे हेच योग्य अन्यथा संसार सुखाचा होऊ शकत नाही.         एकमेकांवर संशय घेणे तू त्याच्या सोबत का बोलली तू त्याच्या सोबत का बोलला ज्या

भोंग्याकडे लक्ष शिक्षणाकडे दुर्लक्ष?

इमेज
          आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देशात होत असलेल्या दूषित राजकारण संदर्भात बोलणार आहोत.देशात महागाई आणि शिक्षणाचे बाजारीकरण यावर आपण प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. भोंग्याकडे लक्ष आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष. आजच्या ब्लॉगचा शीर्षक आहे.चला तर पाहूया शिक्षण आणि भोंगा नेमकी भानगड काय आहे ते.           देशातली राजकीय परिस्थिती ही दूषित झालेली पहायला मिळत आहे.धर्माच्या नावखाली काही राजकीय नेते मंडळी आपली राजकीय भाजत आहे त्यात संकोचिंत बुद्धीचे कार्यकर्ते हे कोणताही विचार न करता हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरत आहे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की पोलीस अपली कारवाई करून परिस्थिती बिघडवू टाकणाऱ्या टोळीवर गुन्हे देखील दाखल करीत आहे.नंतर कार्यकर्ते कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात बिझी होतायेत.           देशात धर्माच्या नावाखाली युवकांची डोके फिरवून भलत्याच खाईत ओढण्याचा काम सध्याची राजकीय वातावरण करत आहेत.कोरोनामुळे आर्थिक मंदी आली यावर कोणीही ब्र काढला नाही मात्र भोंगा आणि हनुमान चालिसा मध्ये अडकवून ठेवत आहे.देशातील वाढती महागाई वरून जनतेची दिशाभूल तर कर

ऑनलाईन शिक्षणाने तरुण पिढी घडतेय?

इमेज
        आज आपण तरुण पिढी संदर्भात काही बाबींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरच तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाने घडतेय? ऑफलाईन शिक्षणच तरुण पिढीच्या ज्ञानात भर पाडू शकते?या आदी विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत.         आजचे तरुण युवक कोणत्या मार्गाला जात आहे हे आपणा सर्वांना माहीत आहेच.भारत देश हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जात आहे.नक्कीच आजची तरुण पिढी ही योग्य मार्गाने जात आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.आजची तरुण पिढी ही ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल मध्ये वेगळेच कारनामे करतायेत आणि त्याला जबाबदार आहे सरकारी यंत्रणा.          ऑनलाइन शिक्षण हे नावापुरते राहिलेले पहावयास मिळत आहे.ऑफलाईन शिक्षण हे विध्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची भर टाकण्यास तत्पर होती.विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाने विचाराने कमकुवत होत चाललेला दिसत आहे.विद्यार्थी दहावीत गेला तरी मराठी वाचण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर देशाचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे.         ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आलेला 40 टक्के विद्यार्थी अजून देखील अज्ञानी दिसत आहे.दहावीच्या वर्गात गेला असून

मानवी जीवनावर मोबाईलचा दुष्परिणाम होतोय?

इमेज
        मित्रांनो आपण आज मानवी जीवणार मोबाईलचा दुष्परिणाम होतोय? का या संदर्भात बोलणार आहोत त्याचे फायदे आहे की तोटे हे देखील आपण पाहणार आहोत.         मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेक समस्या उद्भवत आहे आणि त्याला आपण कारणीभूत आहोत मोबाईलचा अतिवापर हा आपल्या मानवी जीवनावर आणि शरीरावर त्याचा परिणाम होतोय का? आणि होत असेल तर आपण काय केले पाहिजे? हे देखील आपण पाहायला हवे कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्याचा मार्ग देखील असतो याचा देखील मार्ग आहेच पण तो काय आहे यावर आपण प्रकाश टाकणे जरुरी आहे.         कोरोनाच्या महामारी ने देशात थैमान घातले आणि सर्व रोजच्या गरजांवर त्याचा परिणाम होऊ लागला आणि झालाच अस देखील बोलले तर काही वावग ठरणार नाही.विद्यार्थ्यांची शाळा बंद,त्यांचे खेळ बंद झाले आणि मूल मोबाईल मध्ये डोकावू लागले आणि त्यालाच आपले कायमचे आयुष्य बनवून टाकण्यास तयार झाले.ज्या प्रकारे अन्न वस्त्र निवारा जनतेच्या गरजा बनल्या आहेत त्याच प्रकारे आता यामध्ये मोबाईल चा देखील समावेश झाला अस देखील म्हणता येईल आणि ते तितकेच सत्य देखील आहे.         मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थी हे शिक्षणाप

तरुणाई व्यसनाच्या विळख्यात.

इमेज
          नमस्कार मित्रांनो मी नवनवीन विषय ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे.आणि नक्कीच तुम्हाला माझ्या ब्लॉग मधील विषय देखील आवडत असेल.आजचा विषय आपण तरुणाई व्यसनाच्या विळख्यात यावर बोलणार आहोत.         आजची तरुणाई ही व्यसनाच्या आहारी जाताना पाहायला मिळत आहे.मात्र या तरूणाईवर कोणत्याही प्रकारचे अंकुश राहिला नाही हे स्पष्ट दिसत आहे.तरुणाई व्यसनाकडे जाण्याची अनेक कारणे आहेत.१)ज्या ठिकाणी आपण राहत आहोत त्या ठिकानवरील वातावरण.२)वाईट मित्रांच्या संगती.३)कॉलेजचा तास चुकवून फिरायला जाणे.४)घराचा दबाव नसणे मुलगा असो वा मुलगी जास्त लाडावणे.याच्या व्यतिरिक्त अनेक कारणे देखील असू शकतात.         एक दोन टवाळखोरं जमले की शिक्षण व्यवसायच्या चर्चा करणे सोडून तू कोणती दारू पिणार,तू कोणता ब्रँड घेणार,आशा प्रकारच्या उलटसुलट आयुष्याची वाट लावणाऱ्या विषयावर चर्चा करताना दिसतात.भविष्यात आपले ध्येय काय असावे पुढे जाऊन आपण काय केले पाहिजे या शब्दांच्या शृंखलेला झाकून टाकणे आणि बार्बादीच्या खाईत स्वतः जाणे हेच तर पाहायला मिळत आहे.        देशात विदेशी लोक काय करतायेत तसे

युवा पिढी जातीच्या कचाट्यात अडकत तर नाहीना?

इमेज
        आता आपण पाहणार आहोत देशात आणि प्रत्येक राज्यातील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जात आहे ते.देशात राजकीय हालचाल ही फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपडच म्हणावी लागेल यात काही तिळमात्र शंका नाही. देशातील राजकीय परिस्थिती ही देश हिताच्या पहायला मिळत नाही तर समाजात द्वेष निर्माण करणारी परिस्थिती आपल्याला पहायला मिळत आहे.         देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने जी काही आर्थिक अडचण निर्माण झाली त्यावर कोणी प्रकाश टाकताना दिसायला तयार नाही तर त्या समाजामध्ये काय चालू आहे आणि त्यामध्ये कसे व्यत्यय आणता येईल यावर जास्त भर दिला जातोय आर्थिक टंचाई आणि वाढत्या महागाई वर मात्र राजकीय मंडळी शांत झालेली दिसतेय तसेच झोपेचे सोंग घेतले आहे की काय असे देखील म्हणता येईल.          राजकीय मंडळी ही विकासाच्या दृष्टीने शून्य झालेली दिसत आहे मात्र समाजामध्ये तेढ निर्माण होणारी भाषणे करून दूषित वातावरण निर्माण केली जात आहे.राष्ट्रहिताच्या बाबी बाजूला ठेऊन टीका टिप्पणीच्या राजकारणाला जास्त जोर दिला जातोय पण आर्थिक चणचण भासत आहे ते मात्र कोणत्याच राजकीय नेत्यांना का दिसत नाही हा